ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी संतोष भेगडे यांची निवड..

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी संतोष भेगडे यांची निवड.Selection of Santosh Bhegade as Talegaon Dabhade City President of NCP.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ डिसेंबर.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी संतोष भेगडे यांची निवड.पीएमआरडीएचे सदस्य  आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संतोष भेगडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द तसेच कामाची पद्धत आणि जनसहभाग लक्षात घेत पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, कृष्णाजी कारके, शिक्षण मंडळ सदस्य विशाल पवार, माजी नगरसेवक अशोक भेगडे, नंदकुमार कोतूळकर, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर मुलाणी, विकी लोखंडे, महिला अध्यक्षा तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस शैलजा काळोखे, माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या उपस्थित निवडीचे पत्र देण्यात आले.

विविध सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, अध्यात्म आदी क्षेत्रांशी संतोष भेगडे यांची नाळ जोडली गेली आहे. समाजाशी आणि  समाजाप्रती त्यांची भावना दृढ आहे. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची जबाबदारी सांभाळत असताना छोट्या मोठ्या तसेच उदयोन्मुख उद्योजकांना संतोष भेगडे पाठबळ देत आले आहेत. नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना एकत्रित करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे कार्यही ते करत असतात.

संतोष भेगडे हे यशस्वी बांधकाम व्यावसायिक असून, या माध्यमातून अनेकांच्या हातांना रोजगार देण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. तसेच महिला सक्षमीकरणाच्या कार्यात सदैव सक्रिय, गरजूंना आर्थिक मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी यासारख्या पारंपरिक उत्सवांमध्ये तसेच तळेगाववासीयांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवामध्ये हिरीरीने सहभागी होऊन गावातील सर्वांना सहभागी करून घेण्यात त्यांचा पुढाकार असतो.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक अशा विविध पदांवर त्यांनी आजवर काम केले आहे. पीएमआरडीए सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

सामाजिक व राजकीय या दोन्ही बाबींचे सुयोग्य समीकरण करून केवळ नगरसेवक नव्हे तर एक समाजसेवक म्हणून संतोष भेगडे यांनी कोरोनाच्या महासंकटात तळेगाव शहर आणि प्रभाग क्रमांक ११ मधील उपाययोजनांसाठी सहकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यांच्याकडे आता तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!