ताज्या घडामोडी

महागाई,पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीसह देशातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजपा केंद्र सरकार पूर्ण अपयशी

Spread the love

इस्लामपूर दि.२५ प्रतिनिधी
महागाई,पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीसह देशातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजपा केंद्र सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. सामान्य जनता विशेषतः महिलां च्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. आपण महिलां च्यामधील असंतोष संघटीत करून त्यांच्या प्रश्नांच्यावर आंदोलने उभा करा,असे आवाहन युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी इस्लामपूर येथे केले.
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालया त वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस छाया पाटील,प्रदेश सदस्या मेघा पाटील,माजी सभापती सुवर्णा जाधव,जिल्हा उपाध्यक्षा अलका माने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी प्रतिकदादा पाटील यांनी महिलांशी सुसंवाद साधत महिलांचे प्रश्न समजून घेतले.
प्रतिकदादा पाटील पुढे म्हणाले,आपण जिल्हा पतिषद मतदारसंघवार संपर्क दौरे करून महिलांचे प्रश्न, बचत गटांचे प्रश्न समजून घ्या. आपले प्रश्न सोडविण्यात मी स्वतः लक्ष घालणार आहे. राज्याचे जल संपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी महिलांना सातत्याने विविध पदावर काम करण्याची संधी देत महिला सबलीकरणास प्रोत्साहन दिलेले आहे.
तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने म्हणाल्या, तालुक्यातील गावांचा संपर्क दौरा पूर्ण करून महिलांचे प्रश्न समजून घेतले आहेत. क्रियाशील सभासद नोंदणी,एक तास राष्ट्रवादीसाठी यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग आहे. मकर संक्रातीनिमित्त हळदी- कुंकू,तसेच मा.साहेब व पवारसाहेबांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला आहे. महिला दिनानिमित्त गावो-गावी विविध उपक्रम राबविले आहेत. यावेळी त्यांनी महिला संघटनेचा आढावा मांडत,येत्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा,असे महिलांना आवाहन केले.
उपाध्यक्षा वैशाली पाटील,सौ रुपाली ढोकळे, प्रदेश सदस्या सुवर्णा जाधव,मेघा पाटील, जिल्हा उपाध्यक्षा अलका माने, भाग्यश्री पाटील,मीना पाटील,भारती मोरे, मनीषा पाटील,जुनेखेड अध्यक्षा पद्मश्री पाटील,वासंती बंडगर,सहचिटणीस सरिता पाटील या महिलांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुका कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून जयश्री कदम (भवानीनगर),अर्चना पाटील (माणिकवाडी),अनिता गुरव (मालेवाडी),रंजना पाटील (रेठरे धरण) यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते निवड पत्रे देवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रुपाली जाधव, कल्पना कोळेकर, कल्पना पाटील,शोभा पाटील,रेखा पवार यांच्या सह महिला उपस्थित होत्या.
प्रारंभी सरचिटणीस जयश्रीताई पवार शिरटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
उपाध्यक्षा सुजाता पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी- इस्लामपूर येथे वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी च्या बैठकीत बोलताना प्रतिकदादा पाटील. समवेत सुनीता देशमाने,छाया पाटील,मेघा पाटील,संग्राम जाधव व मान्यवर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!