ताज्या घडामोडी

पश्र्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगर पालिका, बँक ऑफ बरोडा यांची उपांत्य फेरीत धडक. सिद्धी स्पोर्ट्स क्लब व्यावसायिक महिला गट कबड्डी स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई दि. २५ :- पश्र्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगर पालिका, बँक ऑफ बरोडा यांनी सिद्धी स्पोर्ट्स क्लब आयोजित व्यावसायिक महिला गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. पश्र्चिम रेल्वे विरुद्ध बृहन्मुंबई महानगर पालिका, बँक ऑफ बरोडा विरुद्ध एमराल्ड द इन्फ्रास्ट्रक्चर अशा उपांत्य लढती होतील. प्रतिक्षा नगर-सायन येथील तांडेल कनोजी आंग्रे क्रीडांगणावर सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात प.रेल्वे या मातब्बर संघाने जानकी रामचंद्र कल्याण केंद्राचा ५३-१९ असा सहज पराभव केला. पहिल्या डावात २७-०९ अशी आघाडी घेणाऱ्या रेल्वेने दुसऱ्या डावात देखील तोच जोश कायम ठेवत ३४गुणांच्या मोठ्या फरकाने उपांत्य फेरी गाठली. आंतर राष्ट्रीय खेळाडू सोनाली शिंगतेच्या झंजावाती खेळाने ही किमया साधली. पकडीत तिला ईश्वरी कोंढाळकरची उत्तम साथ लाभली. कल्याण केंद्राच्या ऐश्वर्या ढवण, सरिता बऱ्या खेळल्या.

दुसऱ्या सामन्यात बृहन्मुंबई महानगर पालिकेने दत्ता इंटरप्राइजेसचा ३५-२४ असा पाडाव केला. रुचिता पाटीलच्या चतुरस्त्र खेळाने मुंबई पालिकेने पूर्वार्धातच १९-१२ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सावध खेळ करीत आपल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दत्ताच्या काजल शर्माने एका चढाईत ४ गडी टिपत कडवी लढत दिली.पण संघाला विजय मिळवून देण्यात ती कमी पडली. शेवटच्या सामन्यात बलाढ्य बँक ऑफ बडोदा संघावर ६५-१० अशी लीलया मात केली. पूजा यादव, हरजित कौर यांच्या तुफानी चढाया त्यांना ऋतुजा बांदिवडेकरची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळेच बँकेने मध्यांतरालाच ३४-०३ अशी मोठी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर देखील तोच जोश कायम ठेवत ५५गुणांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!