आरोग्य व शिक्षण

तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून शहरातील मोबाईल टॉवर सील

Spread the love

तळेगाव: तळेगाव दाभाडे नगर परिषद कर संकलन विभागातर्फे विशेष वसुली मोहिमे अंतर्गत आज दि. 23 मार्च रोजी तळेगाव शहरातील मोठे थकबाकीदार असलेले विविध कंपन्यांचे 6 मोबाईल टॉवर सील करण्यात आले.

मुख्याधिकारी  सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक विजय शहाणे आणि कर संकलन वसुली लिपिक प्रशांत गायकवाड, प्रवीण माने, विलास वाघमारे, आशिष दर्शले, अरविंद पुंड, विशाल लोणारे, आदेश गरुड, प्रवीण शिंदे यांनी त्यांच्या भागातील मोबाईल टॉवर सील करण्यात आले आहे.सदर कंपन्यांना यापूर्वीच जप्ती वारंट देण्यात आले होते. परंतु या कालावधीमध्ये थकबाकी न भरल्याने आजची कारवाई करण्यात आली असल्याचे विजय शहाणे यांनी सांगितले. यासंदर्भात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास सदर कंपन्या यासाठी जबाबदार राहतील असे म्हटले आहे. तसेच थकबाकी न भरलेल्या इतर मालमत्ताची वर्तमानपत्रात जाहीर लिलाव सूचना प्रसिद्द केली जाणार आहे आणि अशा थकबाकी असलेल्या मालमत्ताच्या सीटी सर्वे उताऱ्यावर तळेगाव दाभाडे नप चे नाव लावले जाणार आहे असेही नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!