आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

संत तुकारामांच वचन आहे– मन करा रे प्रसन्न –सर्व सिद्धीचे कारण !

आपलं मन चांगल्या कार्यात गुंतवा ! दॅट्स ऑल ! मग बघा" आनंदाचे डोही आनंद तरंग. डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

Spread the love

 आवाज न्यूज : विशेष लेख. ११ ऑक्टोबर..

संत तुकारामांच वचन आहे– मन करा रे प्रसन्न –सर्व सिद्धीचे कारण ! आपलं मन प्रसन्न करणे म्हणजे नक्की काय करणे ?  त्यासाठी एकच अट आहे की आपलं मन चांगल्या कार्यात गुंतवा ! दॅट्स ऑल ! मग बघा” आनंदाचे डोही आनंद तरंग.

हेच आपण अनुभवणार आहोत! चला तर आपण आणखी अधिक जाणून घेऊया ! हितगुज ! आपल्या मनाशी – त्याच्या संदर्भात ! आपलंच मन काहीवेळा एखाद्या उधळणाऱ्या उन्मत्त जनावरासारख असत !– अशा या मनाला लगाम घालून त्याच्यावर स्वार होण एखाद्याला जर जमलं तर त्याला यशाचं परीस गवसलं असंच म्हणता येईल!-

मित्रांनो जनसामान्यात आपली प्रतिमा उजळावयाला हवी असेल तर प्रयत्नपुर्वक आपलंच मन आपल्याला बदलायला हवं ! कारण केवळ आमच वर वरचं बोलण वागण बदलून आपल्याला चालणार नाही ! मित्रांनो रोजच्याप्रमाणे कपडे बदलल्याने आतला माणूस बदलत नसतो !– नाही तर भगवे कपडे घालणारी सर्वच माणस आपल्याला विरक्त झालेली दिसली असती !

माझ्यापुढे नेहमी एक असा प्रश्न उभा राहतो की– “कंदिलाच्या बाहेर उजेड जो पडतो तो काचेमुळे की आतल्या ज्योती मुळे ? कारण आतली ज्योत विझल्यावर केवळ काचेचा काय उजेड पडणार ? तसंच निर्जीव प्रेताच्या बाबतीत सुद्धा असंच आपल्याला सांगता येईल कारण बांधेसूद रेखीव व सुंदर अवयवांचा समावेश ज्या देहात असेल पण त्यात जर चैतन्य नसेल तर त्याला आपण- अरथी म्हणतो !- म्हणजे असे की– ज्या रथाचा सारथी निघून गेलेला आहे!–म्हणजेच मित्रांनो, ज्या शरीरात चैतन्य अस्तित्वात आहे त्या शरीरातील मनाची शक्ती अपरंपार आहे आणीती सर्व शक्ती जर आपण एकत्र केली तर ती कोंडलेल्या वाफे प्रमाणे अद्भुत असं कार्य करण्यास समर्थ ठरते !

— यातील जिवंत उदाहरण म्हणजे सूर्याची हजारो किरण जर आपण काचेतून एकत्रित करून एका बिंदूत एकवटवली तर त्या एकवटलेल्या केंद्रा खाली असलेला पदार्थ पेट घेतो!– अशाच प्रकारे मनाची हजारो ठिकाणी विभागलेली शक्ती जर आपण एकत्र केंद्रित केली तर त्याच मनाचं सामर्थ्य आपल्यासमोर प्रगट होत ! मित्रांनो एका अनुभवी वृद्ध गृहस्थाने एका तरुणास आनंद प्राप्तीसाठी काही गोष्टी एका कागदावर लिहावयास सांगितल्या त्या तरुणाने, यश ,कीर्ती सन्मान. अशा अनेक गोष्टी लिहून काढल्या पण त्या वृद्ध गृहस्थाच काही समाधान झालं नाही ! म्हणून त्याने त्या सर्व गोष्टी खोडून काढल्या आणि आनंद प्राप्तीसाठी लागणारी केवळ एकच गोष्ट लिहिली ती म्हणजे– मनाची प्रसन्नता !आणि मित्रांनो ही मनाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी एकच अट आहे की– आपलं मन कशात तरी गुंतवणे…– धन्यवाद                            डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!