ताज्या घडामोडी

सरस्वती विद्या मंदिरातील अकस्मात मयत शिक्षक कै परशुराम गांगुर्डे यांच्या वारसास पाच लाख पन्नास हजाराची मदत

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

अध्यक्ष शिक्षक वृंद दात्यांची सहानुभूती( अमळनेर )येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील शिक्षक परशुराम गांगुर्डे यांच्या अकस्मात मृत्युपश्चात त्यांच्या परिवारावर अचानक कोसळलेल्या दुःखाच्या काळात संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी गांगुर्डे कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहात गांगुर्डे परिवारातील मुलींच्या शिक्षणासाठी साठी पाच लक्ष पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत प्रत्यक्ष देऊन गांगुर्डे कुटुंबाला धीर देत आदर्श पायंडा निर्माण केला आहे.
आपल्या संस्थेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी आर्थिकदृष्ट्या उभे राहण्याचा नवा पायंडा श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ,अमळनेर, समता युवक कल्याण केंद्र ,अमळनेर , खान्देश कन्या स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर यांच्या वतीने अध्यक्ष अशोक आधार पाटील, संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक मुख्याध्यापक रणजित शिंदे, शिक्षक वृंद यांनी स्वर्गीय परशराम गांगुर्डे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी साडे पाच लक्ष रुपये मदत म्हणून यावेळी धनादेशाद्वारे दिले,याप्रसंगी युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार, खबरीलाल न्यूज पोर्टल चे संपादक जितेंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते प्रा.लिलाधर पाटील,ज्येष्ठ संचालक किसन पाटील, संस्थेचे संचालक समाधान शेलार, विश्वास पाटील, रामकृष्ण पाटील, मुख्याध्यापक आशिष पवार, सामाजिक कार्यकर्ते संदीप मोरे,विक्रम शिंदे,बबलू मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय परशुराम गांगुर्डे यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या परिवाराला सर्व प्रकारचे शासकीय लाभ नियमानुसार मिळवून देण्यासाठी देखील संस्था प्राधान्याने प्रयत्न करेल असे यावेळी संस्थेच्या वतीने अध्यक्ष अशोक पाटील, मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी सांगितले.परिवाराला युवा कल्याण प्रतिष्ठाण तर्फे शैक्षणिक वाटचालीसाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे यावेळी प्रा अशोक पवार यांनी सांगितले.संस्था तत्परतेने गांगुर्डे परिवाराच्या पाठीशी पालकत्वच्या नात्याने उभी राहिल्याने आधार वाटत असल्याचे समाधान सौ.जयश्री गांगुर्डे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी परिवारातील सदस्य रविंद्र देवरे,विलास मोरे,मुकेश मोरे,देविदास सोनवणे,सुनिल मोरे,पोपट वाघ,अतुल सावकारे,रामदास मोरे,पिंटू अहिरे आदींसह संस्थेचे कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!