आरोग्य व शिक्षण

शिवसेना लोणावळा शहर आयोजित शरिरसौष्ठव स्पर्धेत हिंदुहृदयसम्राट श्री २२ चा मानकरी प्रशांत कोराळे ;लोणावळा श्री २०२२ अविनाश खैरे

Spread the love

लोणावळा : छञपती शिवाजी महाराज तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव भव्य मिरवणूक , डान्सस्पर्धा आणि शरिरसौष्ठवस्पर्धा भरवून साजरी करण्यात आली.
शिवजयंती निमित्ताने अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे जयंती महोत्सव मोठ्या भव्य प्रमाणात २१ मार्च २०२२ ते २३ मार्च रोजी सकाळी जयचंद चौकात भगवा ध्वजारोहन मान्यवरांचे हस्ते करून , शिवप्रतिमा पूजनाने,सत्यनारायणाची पूजा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली . यावेळी मिरवणुकीत महिला पदाधिकारी या भगवे फेटे बांधून सहभागी झाल्या होत्या.

शिवजयंती महोत्सवा निमित्त लोणावळा-खंडाळा मर्यादित नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेसाठी स्पर्धेक व लोणावळेकर नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थितीत होते.शिवसेना लोणावळा शहर शिवजयंती महोत्सव आयोजित पुणे जिल्हा स्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा हिंदुह्रदयसम्राट श्री २०२२ ” चा मानकरी प्रशांत कोराळे याने ; तर लोणावळा श्री २०२२ ” चा मानकरी अविनाश खैरे यांनी पटकावली.

ह्या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे , तालुकाप्रमुख राजुभाऊ खांडभोर, संघटक अंकुशराव देशमुख, उपतालुकाप्रुख आशिष ठोंबरे, बाॅडीबिल्डींग असोसिएशनचे डाॅ. संजय मोरे, अध्यक्ष मनोज जरे , राजेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्लै, नगरसेवक निखिल कविश्वर, नगरसेवक माणिक मराठे, नगरसेविका सिंधू परदेशी, नगरसेविका कल्पना आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जीवन गायकवाड, मावळवार्ता फाऊंडेशनचे किरण गायकवाड,जितेंद्र कल्याणजी, संजय अडसुळे, नंदकुमार वाळुंज, सचिन पारख, बाबुभाई शेख, विनय विद्वांस, नासीर शेख ,सरपंच बंडुभाऊ फाटक, नंदुभाऊ फाटक,झिशान शेख, समन्वयक जयवंत दळवी, सल्लागार रामभाऊ थरकुडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख मनेष पवार, उपशहरप्रमुख प्रकाश पाठारे, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, उपतालुका संघटीका संगिताताई कंधारे, श्रीमती आक्का पवार, शिवजयंती महोत्सव अध्यक्ष श्रीकांत कंधारे, कार्याध्यक्ष प्रशांत आजगेकर, रविंद्र टाकळकर, सुरेश टाकवे, नरेश काळवीट, पंकज खोले, माजी नगरसेवक मधुकर पवार, मंगेश येवले, अशोक गवारणे, गणेश वाडकर, प्रकाश काळे, सुनिल मराठे, दत्ता थोरवे,गणेश फरांदे , संजय शिंदे, अशोक बोंद्रे, विजय आखाडे, संतोष मेंढरे, सहसंघटिका मनिषा भांगरे, उपशहरसंघिका प्रभाताई आकोलकर, सुरेखा देवकर, उत्तम ठाकर, ओम फिटनेस क्लब चे ओमकार फाटक व त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार व शिवसेना युवासेना महिला आघाडी वाहतुक सेना व सर्व आजीमाजी पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते.आर पी आय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनीही हजेरी लावली.सूञसंचालन संजय भोईर यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!