आरोग्य व शिक्षण

गावठाण लोणावळा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने सांगता

दि .२७ रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन

Spread the love

लोणावळा : ग्रामदैवत श्री ढाक भैरवनाथ व श्री बाळभैरवनाथ उत्सवानिमित्त गांवठाण लोणावळा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प.वैराग्यमुर्ती गणेशमहाराज कार्ले (वाकडेवाडी , पुणे) यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली.यावेळी नामवंत वारकरी व मान्यवर उपस्थित होते.

ह.भ.प.कार्ले महाराज म्हणाले , हा अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पन करत असताना शतक साजरे होईल, गाथा पारायणात जी मजा आली.जो आनंद मिळाला , तो अत्यत दूर्मिळ आहे. भगवंताने वृंदावनात हजारो गोपीकांसोबत जी रासक्रीडा केली ती आद्भूत आहे. ब्रम्हदेवाच्या सहा महिनेपर्यत ती रासक्रीडा चालली. यात प्रत्येक गोपी व एकएक गोपाळकृष्ण बनून रासलीला दाखविली.तेथे भगवान महादेवानेही स्ञीवेष परिधान करून यामधे सहभागी झाला. गोकुळात भगवंताने काला केला व सर्व गोरगरीब , सवंगड्यांबरोबर तो वाटला.

उत्सवानिमित्त ता.२७ रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन टाटा तलावात करण्यात आले आहे. यावेळी प्रथम क्रमांकाला ३१ हजार ,दुसऱ्या क्रमांकाला -२५ हजार,तिसऱ्या क्रमांकाला -२० हजार,चवथ्या क्रमांकाला १५ हजार व पाचव्या क्रमांकाला १० हजार तसेच फायनलसाठी प्रथम तीन क्रमांकाला चांदीची गदा देण्यात येणार आहे. घाटाचा राजा किताब कु.दक्ष अक्षय हारपुडे यांचेतर्फे आकर्षक ढाल देण्यात येणार आहे.

ता.१८ ते २४ पर्यत संत तुकाराम महाराज गाथेचे संगीत पारायण ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले , व्यासपीठ चालक यांचे नेतृत्वाखाली व उत्सव समिती अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ हारपुडे , माजी उपनगराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , समितीचे खजिनदार खंडू कंधारे यांचे उपस्थितीतीत झाले. यानंतर सायंकाळी ५ वाजता गाथा मिरवणूक झाली. सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प.दिलीप महाराज खेंगरे , ह.भ.प.तुषारमहाराज दळवी , ह.भ.प.गणेशमहाराज पारखी आणि वैराग्यमुर्ती जेष्ट कीर्तनकार गुलाब महाराज खालकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा झाली.

यावेळी मावळ तालुका दिंडी समाजचे अध्यक्ष नरहरी केदारी , उपाध्यक्ष अशोक राऊत, माजी उपनगराध्यक्ष व उत्सव समिती अध्यक्ष भरत हारपुडे , माजी नगराध्यक्ष अमित गवळी , आंबवणेच्या माजी आदर्श सरपंच वत्सला नंदकुमार वाळंज , सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज , आंबवणेचे सरपंच मच्छिंद्रशेठ कराळे, तरूण मराठा मंडळ विश्वस्त अध्यक्ष अमोल आण्णा ओंबळे, माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , माजी उपनगराध्यक्ष संजय घोणे, उद्योजक सुबोध खंडेलवाल , श्री भैरवनाथ देवस्थान मुख्य विश्वस्त प्रकाश आप्पा गवळी ,उद्योजक रवि सलोजा, उत्सव समिती उपाध्यक्ष नारायण वाळंज , सरचिटणीस प्रकाश तांबट, पोलिसपाटील प्रकाश हारपुडे , विजय हारपुडे , मृदूंगमणी संदीप घारे, निवृत्ती मराठे, कमिटीचे सदस्य पांडुरंग हार्डे, किसन पांगारे , गोपाळ हारपुडे , राहुल पंधारे, सुनिल हारपुडे , सुमित गवळी, दामुआण्णा चव्हाण, आदी उपस्थित होते. , माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा ,दिलीप मानकामे,माजी नगरसेविका जयश्री काळे, तसेच गायक भिमाजी भानुसघरे , भाऊसाहेब निपाणे , दिलीप खेंगरे , माऊली तिकोणे , संदिप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंदिराचे गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट स्वनिल कारके व संदिप पवार यांचेतर्फे केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!