आरोग्य व शिक्षण

माकुणसार हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
एस. के. पाटील विद्यामंदिर माकुणसार शाळेत दी शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया, मुंबई यांच्याकडून व सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने शाळेतील सर्व १९७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तर यांचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी दी शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया मुंबई च्या मल्लिका शेट्टी, नीरज बाजपेई, सेवा सहयोग संस्था मुंबईचे विशाल देसाई, राजेश शेट्टी उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम च्या पथकाने स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोलवड यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खुप आनंद झाला आहे व त्याचा वापर निश्चितच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केला जाईल असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून स्वतः चे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे यासाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिस्त, स्वच्छता व कार्यक्रमाचे नियोजन यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे उपस्थितांनी कौतुक केले. शाळेतील शिक्षक जीवन बेलकर यांनी स्वतः तयार केलेल्या वारली चित्रकला च्या फोटो फ्रेम मान्यवरांना भेट देण्यात आल्या. इयत्ता दहावीची विद्यार्थीनी तनिष्का पाटील हिने आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्यामुळे खुप आनंद झाला असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक पराग पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश कोळेकर यांनी केले. तर शाळेतील शिक्षक पी. पी.भदाणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाळा व संस्थेच्या वतीने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!