ताज्या घडामोडी

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

Spread the love

जिल्हा शासकिय रुग्णालय, रत्नागिरी मौखिक आरोग्य तपासणी व विदयार्थी बक्षीस वितरण समारंभ ( दिनांक ३० मार्च २०२२ )

दि. ३० मार्च २०२२ रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांचे अंतर्गत शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे माननीय मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचे सहकार्याने रत्नागिरी जिल्हयातील काही निवडक शाळांतील विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील संशयित मौखिक कर्करोग रुग्ण तपासणी मोहीम याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मा. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी, डॉ. संघमित्रा फुले- गावडे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ. प्रणव साठे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ. शैलेश गावंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये शाळांमध्ये जनजागृती केलयाबद्दल श्री सचिन भरणे व समुपदेशनावद्दल श्रीमती प्राची आशिष भोसले यांनादेखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान श्री तुषांत भिंगार्डे, नोवार्टिस आरोग्य परिवार व उपजिल्हा रुग्णालय कळंबणी यांना देखील उत्तम कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तंबाखू सेवन हे जगामध्ये होणाऱ्या विविध आजाराचे व मृत्यू होण्याचे टाळता येण्यासारखे एक प्रमुख कारण आहे. भारतात प्रत्येकवर्षी जवळपास ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या आजारांमुळे होतो. विविध प्रकारचे हृदयरोग, फुप्फ · साचे आजार, कर्करोग हे देखील तंबाखू सेवनाशी निगडीत आहेत, असे मत मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनी व्यक्त केले. तसेच उपस्थित विदयार्थी, पालक, शिक्षक तसेच रुग्ण यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देखील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी मांडलेल्या मनोगतात व्यक्त केला.

मान्यवरांच्या मनोगतानंतर काही निवडक जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळांतील विदयार्थ्यांचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दर्शविणारे चित्रकला व रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक काढलेल्या विदयार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग, पेटींग कलर व पेन बॉक्स देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. प्रणव साठे यांनी आलेल्या रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी करून व्यसन सोडणेकरिता औषधे देऊन रुग्णांचे समुपदेशन केले. सदर शिबिराचे दरम्यान १६ संशयित मौखिक रुग्णांची तपासणी करण्यांत आली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा रुग्णालय एनसीडी विभाग, दंत विभाग येथील कर्मचारी, अर्श समन्वयक, नेत्र विभाग समुपदेशक तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समुपदेशक प्राची भोसले, सामाजिक कार्यकर्ता सचिन भरणे, सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथील समुपदेशक, जिल्हा परिषद श्री. रेळेकर यांनी विशेष सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रीम. प्राची आशिष भोसले यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!