ताज्या घडामोडी

पैशाला कोंबड्या खात नाही-हे म्हणायचे दिवस आता गेले.. पैसा हा मनुष्य जीवनाच्या केंद्रस्थानी एकवटला आहे…₹

Spread the love

त्यासंदर्भात खास लेख.
*नववर्षातील अर्थनियोजन*
@डॉ•डी•एस•काटे✓.✍🏻

भारतीय अर्थव्यवस्थेतील नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात,१ एप्रिल पासून झाली आहे त्याचबरोबर गुढीपाडवा या दिवसापासून (२एप्रिल) मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे ..
या दोन्ही नवीन वर्षात पदार्पण करताना आपणास आर्थिक आव्हान व ज्ञान याचा ताळमेळ बसवणे अत्यंत गरजेचे आहे.

कमावलेल्या पैशाची अंमलबजावणी -नियोजन व संकल्प करणे ही प्रत्येकाची आद्य जबाबदारी होऊन बसली आहे..इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की.
*If wishes were horses, beggars would ride on them*
याचा अर्थ असा आहे की इच्छा घोड्याप्रमाणे असत्या तर गरीब त्यावर स्वार झाले असते…

अर्थातच यातून असा बोध होतो की आपल्या मनाप्रमाणे अर्थप्राप्ती, खर्च ,उत्पन्न व त्यातून मिळणारा सुखी जीवनाचा लाभ मनाप्रमाणे घेतला असता तर सर्वच श्रीमंत असते ..

सर्व सुखी समाधानी असते पण तसे
अर्थजगतामध्ये कधीच घडत नसते.

येणारे आर्थिक वर्ष हे कसोटीचा काळ आहे कारण आपण सर्वजण जागतिक खुल्या बाजारपेठेशी जोडले गेलो आहोत . युद्ध त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणारे बदल याचा परिणाम जगातील प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि तेथील नागरिकावर दिसून येतो …

मागील काळातील
करोनाची रोगराई ,आत्ताचे रशिया युक्रेन युद्ध त्याचबरोबर वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी ,आरोग्याचा वाढता खर्च आणि अनेक देशाच्या डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्था !!!

या सर्वांचे परिणाम या नवीन वर्षामध्ये जगभर दिसून येतात ..

अशा संकटकालीन पार्श्वभूमी व परिस्थिती असताना आपल्या स्वतःचे व कुटुंबाचे अर्थ नियोजन ह्या वर्षात योग्य पद्धतीने केले तरच आपण थोडेफार सुखी जीवनाचा आनंद घेऊ शकतो.

१) मानवाच्या सर्व गरजा व चरितार्थ चालवण्यासाठी इंधन व ऊर्जा याचे महत्त्व अनन्यसाधारण होऊन बसले आहे..
त्यामुळे यावर होणारा खर्च प्रत्येकास पेलवणारा नाही ..
पेट्रोल डिझेल याची
भाववाढ येथून पुढे होतच राहणार !!!
त्यामुळे कमी खर्चामध्ये आपला कार्यभाग कसा होईल याचे नियोजन असावे …
ऊर्जा व इंधन वापर सिमित असावा.

२) सरकारी योजना असो किंवा गुंतवणूक त्याचबरोबर बँकेतील व्यवहार हे सर्व आता संलग्नित झाल्यामुळे त्याविषयी आपणास आद्यवत बद्दल व माहिती घेणे आवश्यक आहे…

बँकेतील खाते केलेली गुंतवणूक त्याचबरोबर त्यांची नियम याचीसुद्धा इथंभूत माहिती आपणास हवी आहे जेणेकरून आपल्याला येणारे सर्व उत्पन्न हे बँकेतून अथवा संदर्भित आर्थिक संस्था कडूनच आता होईल याची खात्री करावी.

जास्तीत जास्त व्यवहार बँकेद्वारे किंवा डिजिटल प्रणालीद्वारे असावे जेणेकरून आपली आर्थिक पत वाढत जाईल.

३) आपण घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज हप्ते याचे वेळेस हप्ता भरणे इथून पुढे आवश्यक राहील !!
कारण आपल्या क्रेडिट स्कोर शिवाय कोणत्याही वित्तीय संस्था व बँक इथून पुढे पतपुरवठा अर्थात कर्ज देणार नाही..

क्रेडिट कार्ड ,खाजगी योजना दामदुप्पट करून येणाऱ्या भ्रामक योजना यापासून आपण सावध राहिलं पाहिजे ,,

नाहीतर विनाकारण आपल्या उरावर कर्जाचा डोंगर साठला जातो..

४) आपल्याला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणत्या वर्षभरातील येणारी आवक किती खर्च किती ??

याचे योग्य नियोजन आपल्याला करणे आवश्यक आहे त्याच बरोबर पर्यावरण असंतुलनामुळे येणाऱ्या रोगराई आणि अचानक वाढणारे आरोग्याचे खर्च याचासुद्धा एक अत्यावश्यक खर्च म्हणून बाजूला ठेवणे आवश्यक वाटते..

नवीन वर्षात सरकारने कर व इतर वित्तीय बदल बदल कोणकोणते गेलेले आहेत याची माहिती असूनही जरूर असून त्याप्रमाणे आपले आर्थिक व्यवहार निर्बंधित करणे योग्य राहील..

बक्कळ पैसा कमाई होईल व त्यातून बेसुमार आपण खर्च करू असे दिवस आता राहिले नाही..
इथून पुढे कमाईचा प्रत्येकी व्यवहाराची सरकारी दरबारी नोंद असेल ”
*धना मेळविल्या कोडी•*
*काळ घेतल्या न सोडी•*

कितीही धन मिळवले तरी माणसाचे मरण अढळ आहेच ..
पण ही खरेच आहे की
*अर्थो हि लोके पुरुषस्य बंन्धु:*

फाटलेल्या व्यवहार व दुरावलेली माणसं हे पैसे आल्यानंतर सुद्धा एकत्र येतात …

येणाऱ्या नवीन वर्षात आपण मिळवलेल्या पैशाचा योग्य वापर ,
पैसा योग्य मार्गाने खर्च करून पैशाच्या लाभापासून स्वतःचे कुटुंबाचे रक्षण करणे त्याचबरोबर संकटात उपयोगी येण्यासाठी पैशाचे रक्षण करणे हे महत्त्वाचे ठरेल..

चला नवीन वर्षात आपण वरील सांगितलेल्या सूत्राप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!