आरोग्य व शिक्षण

तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे ३० मे पूर्वी पूर्ण करा – आमदार शेळके

तळेगाव दाभाडे येथील रस्त्यांच्या कामाची आमदार सुनिल शेळके यांनी केली पाहणी

Spread the love

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील सुरू असलेल्या विविध रस्त्याच्या कामांची शुक्रवारी (दि.१) आमदार सुनिल शेळके यांनी अधिकारी व ठेकेदारांसह पाहणी करत कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकारी आणि ठेकेदार यांना सूचना केल्या आहेत. यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता वैशाली भुजबळ,पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, उद्योजक विलास काळोखे, माजी नगरसेवक यादवेंद्र खळदे,चंद्रभान खळदे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, अरुण माने, दिलीप खळदे,आशिष खांडगे, तुषार काळोखे आणि अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके यांनी नगरपरिषदेच्या हद्दीतील सुरू असलेली कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी लक्ष देत आहेत. तळेगाव शहरात अनेक रस्त्यांची कामे संथगतीने सुरू होती तसेच काही रस्त्यांची कामे ठेकेदार दर्जेदार करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. म्हणून आमदार शेळके यांनी शुक्रवारी (दि.१) तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामांचा पाहणी दौरा करत ३० मे पर्यंत शहरातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. तसेच आपल्या परिसरात सुरू असलेल्या कामांवर नागरिकांनी देखील लक्ष द्यावे. असे आवाहन देखील आमदार शेळके यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.

या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार शेळके यांनी तळेगाव ते सोमाटणे फाटा यांना जोडणाऱ्या व नव्याने होत असलेला रस्ता, तळेगावातील श्री शिवाजी टॉकीज लगत तांबोळी यांचे घर ते राम मंदिर व सुभाष मार्केट पर्यंतचा रस्ता, बेदरकर हॉस्पिटल ते कडोलकर कॉलनीतील महाजन यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर कारपेट करणे, षटकार कॉलनी ते शिक्षक सोसायटीपर्यंतच्या रस्त्यावर कारपेट करणे, उमंग सोसायटी ते टेलिफोन एक्चेंज रस्ता सुधारणा करणे, एमएसईबी ऑफिस ते तळेगाव चाकण महामार्गापर्यंत रस्ता करणे, राजगुरव कॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, हरणेश्वर कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे, शहा कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवर कारपेट करणे व मावळ लॅंडमधील अंतर्गत रस्त्यांचे कारपेट करणे, उमाकांत कुलकर्णी यांच्या घरापासून ते पटनी यांच्या घरपर्यंतच्या रस्त्यावर कारपेट करणे व इंद्रायणी कॉलेज समोरील रस्त्यावर कारपेट करणे अशा एकूण १० कोटी १३ लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!