आपला जिल्हाकृषीवार्ता

इंद्रायणी, जिरा कोलम व ब्लॕक राईसची भाजेतील माजी सरपंचांनी केली लागवड.

शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल , या हेतूने इंद्रायणी बरोबरच या बियाणाचा यावर्षी प्रयोग केला आहे.

Spread the love

इंद्रायणी , जिरा कोलम व ब्लॕक राईसची भाजेतील माजी सरपंचांनी केली लागवड.Indrayani, Jeera Kolam and Black Rice were cultivated by the former Sarpanch of Bhaje.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १९ जुलै.

इंद्रायणी , जिरा कोलम व ब्लॕक राईसची भाजेतील माजी सरपंचांनी व प्रगतीशील शेतकऱ्यानी लागवड केली आहे.सिंचन विहीर व इंद्रायणी नदीवरून आणलेल्या पाण्यावर भातरोपांची उगवण करून लागवड  करून टाकणारे भाजेचे माजी सरपंच व प्रगतीशील शेतकरी यांनी मजुरांचे सहाय्याने अवनीची कामे उरकून घेतली आहे.

पदमुले यांनी दोन्ही मुलांना शेतीबद्दल प्रेम व माहिती दिल्याने मुलेही नरेश पदमुले व योगेश पदमुले हे या कामात वडिलांना मदत करत आहेत. लोहगड रस्त्याच्या बाजूलाच दोनशे मीटरवर पदमुले यांची भातशेती आहे. विहीरीचे पाणी  पुरेसे नसल्यामुळे, नदीतील पाणी पाइपलाइन द्वारे आणून भातशेती करतात, रब्बी पिकेही ते दरवर्षी घेतात, कलींगड , शेवगा,  टाॕमेटो , कांदा , बटाटा वांगी ही नगदी पिकेही ते घेतात.

पदमुले यांनी यावर्षी जिरा कोलम व ब्लॕक राईसची लागवड उत्पादन वाढावे व किंमती भात, तांदूळ याचा शेतकऱ्यांना  जास्त फायदा होईल , या हेतूने इंद्रायणी बरोबरच या बियाणाचा यावर्षी प्रयोग केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!