आरोग्य व शिक्षण

तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रोगनिदान व उपचार विभागाचे उद्घाटन

Spread the love

तळेगाव : येथील जनरल हॉस्पिटल आणि अन्को लाइफ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रोग निदान आणि उपचार यासाठी बाहेर रुग्ण विभागाचं नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर काल (दि 7 ऑक्टोबर ) रोजी सकाळी 11 वाजता तळेगावनगर परिषदेचे मुख्याधिकारी  सतीश दिघे यांच्या हस्ते उद्घाटन झाले .

याच वेळी गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी एका वार्डाचे उद्घाटन तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते झाले. या दोनही उद्घाटनास तळेगाव जनरल हॉस्पिटल संस्थेचे उपाध्यक्ष  गणेश खांडगे, संस्थेचे चेअरमन  शैलेश शहा, माजी सीईओ डॉक्टर अशोक निकम,  अधीक्षक डॉ. संजय कडलास्कर, समन्वय अधिकारी डॉ. सत्यजीत वाढवकर, खजिनदार  विनायक अभ्यंकर, विश्वस्त  हेमंत सरदेसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी, डॉ. शाळीग्राम भंडारी आणि अन्को लाइफसातारा हॉस्पिटलच्या वतीने सचिन देशमुख, डॉ. प्रतापराव राजेमहाडिक, डॉ. मनोज लोखंडे आणि डॉ. मनोज तेजानी उपस्थित होते.

संस्थेचे चेअरमन शैलेश शहा यांनी  सर्व उपस्थितांचे स्वागत करून या कॅन्सर हॉस्पिटल उभारण्या मागील प्रेरणा आणि उद्दिष्ट आपल्या मनोगतात प्रगट केले. सचिन देशमुख आणि डॉ. प्रतापराव राजेमहाडिक यांनी आपल्या सातारा येथे कार्यरत असणाऱ्या अंकोलाईफ हॉस्पिटलच्या कार्यरत असणाऱ्या विविध हॉस्पिटल संबंधी आणि आरोग्य सेवेविषयी उपस्थितांना माहिती दिली.

उद्घाटक तळेगाव नगर परिषद मुख्याधिकारी  सतीश दिघे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक- शारीरिक- मानसिक या सर्व दृष्टीने हैराण करणाऱ्या रुग्णाला अत्याधुनिक उपचाराची उपलब्धता करून दिल्याबद्दल दोन्ही संस्थांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक केले. भविष्यकाळात मुंबई ते पुणे या दरम्यान असणाऱ्या तळेगावच्या हॉस्पिटलला कॅन्सर क्षेत्रात उत्तमोत्तम यश मिळो.पंचक्रोशीत तळेगाव दाभाडेच नाव या संदर्भात आदरपूर्वक घेतलं जावो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

आभाराच्या आपल्या मनोगतात विश्वस्त डॉक्टरशाळीग्राम भंडारी यांनी,कुठल्याही पीडित रुग्णाचा लाखमोलाचा प्राण वाचवण्यास डॉक्टरांच वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्य अतिशय आवश्यक असतं आणि तेच या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असेल याची संतवाणी आणि उपनिषदातील विविध दाखले देऊन ग्वाही दिली. तसेच या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी ज्यांचा ज्यांचा हातभर लागला आणि उद्घाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी उपस्थिती दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने या सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!