ताज्या घडामोडी

खा. शरदचंद्र पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिराळा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने

Spread the love

प्रतिनिधी / राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवारसाहेबांच्या निवासस्थानावर काल (ता. ८) भ्याड हल्ला झाला. या हल्याच्या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी आज (ता. ९) शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. हल्ल्याचा निषेध करून तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक,यांनी केले. तालुक्याचे माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वासचे संचालक विश्वास कदम, सुखदेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, वारणा कारखाना संचालक विजय पाटील, नगराध्यक्ष प्रतिभा पवार, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष साधना पाटील, नगरसेवक सुनंदा सोनटक्के, सुजाता इंगवले, मोहन जिरंगे, बंडा डांगे, सीमा कदम, रंजना यादव, किर्तिकुमार पाटील व संजय हिरवडेकर, रुपाली कदम, वैशाली कदम, अर्चना कदम, सुनील कवठेकर, अजय जाधव, अमित गायकवाड, अनिरुद्ध नलवडे, राजू निकम, राजसिंह पाटील, विनोद कदम, उदय गायकवाड डॉ. शैलेश माने, सुनिल तांदळे, शिवाजी शिंदे, जयवंत गायकवाड, प्रथमेश शिंदे, अमर पाटील, आदी मान्यवर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष विराज नाईक म्हणाले, देशाचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या “सिल्वर ओक” या रहात्या घरावर काही लोकांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे भरकटलेल्या लोकांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करित आहोत. दगडफेक केली हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आज या सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने महामंडळाला दिलासा देत त्यांना एक आश्वासक निर्णय दिला. त्याचे सर्वांनी स्वागत केले, असताना याच महामंडळाच्या नावाखाली काही समाज कंटकांनी हा भ्याड हल्ला करणे चुकीच आहे. याचा आम्ही जाहिर निषेध करत आहोत. या घटनेचा योग्य तो तपास करुन यामागचा करता-करविता कोण आहे, याचा तपास करुन या भ्याड हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आपणाला नम्र विनंती आहे. आमच्या या भावना सरकार दरबारी पोहोचवाव्यात. यावेळी रणधीर नाईक यांचेही भाषण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!