सागाव आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संम्पन्न
शिराळा प्रतिनिधी
सागाव (ता. शिराळा) येथे 3.5 कोटी रुपये खर्चाच्या आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक हस्ते संपन्न झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. अश्विनीताई नाईक, तालुक्याचे माजी सभापती व सदस्य सम्राटसिंग नाईक व सौ. वैशालीताई माने, विश्वासचे माजी संचालक मानसिंग पाटील व संचालक बाबासो पाटील, बळीदाजी पाटील, सरपंच तात्यासो पाटील, उपसरपंच सत्यजीत पाटील, रामभाऊ संकपाळ, सदाशिव संकपाळ, सौ. रुपाली पाटील, जयसिंग पाटील, उमाजी पाटील, विनायक पाटील, शशिकांत गुंगा पाटील, जालींदर फातले, डॉ. बी. बी. निर्मळे आदी मान्यवर, वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.