ताज्या घडामोडी

लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न- अमितभाऊ काळभोर

Spread the love

लोणी काळभोर- संत गाडगे बाबा महाराज जंयती तसेच अमित भाऊ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मा.उपसभापती सनीशेठ काळभोर , लोणी काळभोर सरपंच राजाराम बापू काळभोर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेस ठिंबक सिंचन 2 बंडल देण्यात आले.या वेळी भरत काळभोर, नागेश काळभोर, राजेंद्रआबा काळभोर, युवराज काळभोर, सचिन काळभोर, उध्दव कदम, सागर काळभोर, अमित जगताप,,दत्तात्रय शेंडगे, दिगंबर जगताप, बाबासाहेब यादव, बिरूदेव भास्कर तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक- विद्यार्थी , लोणी काळभोर ग्रामपंचायत, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते .या वेळी बोलताना राजेंद्र आबा काळभोर यांनी संत गाडगे महाराज यांच्या बद्दल महिती दिली अमरावती, 23 फेब्रुवारी : संत गाडगेबाबा यांची आज जयंती. महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार. 23 फेब्रुवारी, 1876 मध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अंजनगावात त्यांचा जन्म झाला आहे. धोबी कुटुंबात जन्मलेले डेबूजी झिंगराजी जानोरकर पुढे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले.

धर्मशाळेजवळील एका झाडाखाली त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं. डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडकं, फाटलेली चादर हीच त्यांची संपत्ती होती.
अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचं ध्येय होतं. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करत. संत गाडगेबाबा जिथं कुठे जायचे तिथंला रस्ता स्वच्छ करण्याचं काम हाती घ्यायचे. गावातील लोक त्यांना पैसे द्यायचा ज्याचा उपयोग त्यांनी समाजविकासासाठी केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, हॉस्पिटल आणि जनावरांसाठी निवारा बांधला.ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर हवेली तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब यादव यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!