ताज्या घडामोडी

समाजसेवक किसान (बाळा) भाऊ गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण वाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न

Spread the love

अंबरनाथ मध्ये जन सेवार्थ शिवसेनेची प्रचंड घोडदौड सुरूच..शिवसेना पक्ष म्हणजे वटवृक्ष*
एकदा का त्या वटवृक्षाच्या सानिध्यात आलात तर मग आपोआप जन हितार्थ विचार आणि आचार प्रकर्षाने मनात सुरू होते.
शिवसेनाप्रमुखांच्या सानिध्यात वाढलेले आणि वावरलेले ठाणे जिल्हा पालक मंत्री
*मा.एकनाथ शिंदे साहेब*
असोत अथवा कार्यसम्राट
*खा.डॉ.श्रीकांत शिंदे*
किवा जिल्हाप्रमुख
*मा.गोपाळजी लांडगे साहेब*
यांच्या मनात आणि आचरणात सदा जनहिताचा विचार नांदत असतो.
त्यांच्याच खांद्याला खांदा लावून अंबरनाथ शहराची धुरा समर्थपणे सांभाळणारे शिवसेना शहरप्रमुख
*श्री.अरविंद वाळेकर*
यांनी अंबरनाथ शहरातील तुलनेने दुर्गम भाग असलेल्या
*जावसाई,फुलेनगर,वाडी व परिसरातील*
सर्वसामान्य नागरिकांसाठी शिवसेना विभाग प्रमुख *श्री.किसन(बाळा)गायकर*
यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिका लोकार्पण केली.
सदर विभागात मोलमजुरी करून आपले जीवन चरितार्थ चालवणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असून अंबरनाथ शहराच्या मुख्य वस्ती पासून तुलनेने दूर आणि दुर्गम असलेली ही वस्ती आहे.
*शिवसेना शहर प्रमुख यांचे शहरावर बारीक नजर असल्याचे पुन्हा एकदा या रुग्णवाहिकेचा लोकार्पनातून सिद्ध होत आहे.*
मोलमजुरी करून जगणाऱ्या या विभागातील नागरिकांना रात्री-अपरात्री वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी कीवा *अंबरनाथ शहरामध्ये येण्यासाठी अंदाजे १ किलोमीटर प्रवास करावा लागत असतो.*
आणि वेळेवर ॲम्बुलन्स उपलब्ध होईल याची कोणतीही शाश्वती नसते म्हणूनच या रुग्णवाहिकेची खऱ्या अर्थाने खूप गरज होती.
आणि शिवसेना विभाग प्रमुख *श्री.किसन(बाळा)गायकर* यांच्या मागणीनुसार आणि शिवसेना शहरप्रमुख
*श्री.अरविंद वाळेकर*
यांची सर्वसामान्य नागरिका प्रती असलेली आस्था
*या सर्वाची प्रचिती जावसईकरांना आपली हक्काची रुग्णवाहिका उपलब्ध झाली.*
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण तर होतेच परंतु ज्यांनी शिवसेना नावाचा विचार कधी केला नसेल ते देखील
*या समयी “जय महाराष्ट्र” आणि शिवसेनेचा विजय असो अशा घोषणा देण्यामध्ये आनंद व्यक्त करत होते.*
सोबतच शिवसेना पक्षाचे आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचे आभार मानायला विसरले नाहीत.
*या कार्यक्रमामुळे शिवसेना पक्षाचा प्रसार आणि प्रचार होत असून शिवसेना पक्षाची ताकद वाढवणारा हा कार्यक्रम होता यात कोणतीही शंका नाही.*
आणि सोबतच त्या विभागात पक्षाला उभारी मिळली असून कार्यकर्त्यांना मध्ये उत्साह संचारला होता.
*शिवसेना पक्षाचा ताकद वाढावी म्हणून सतत कार्यरत असणाऱ्या शिवसेना शहर प्रमुख यांना पुन्हा एकदा अंबरनाथच्या शिवसैनिकांकडून धन्यवाद आणि आभार.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!