ताज्या घडामोडी

कोपरगाव मध्ये नाते शब्दांचे साहित्य मंच व्दारा भव्य काव्य संमेलन जल्लोषात संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई
रविवार दिनांक १०एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोपरगाव मधील श्रीमती यमुनाबाई वाघ सभागृह, आचारी रुग्णालया जवळ,नाते शब्दांचे साहित्य मंच व्दारा भव्य दुसरे राज्य स्तरीय काव्य संमेलन मोठ्या जलोषात संपन्न झाले. यात काही कवी/कवियित्री यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीं नाते शब्दांचे साहित्य मंचचे ज्ञानेश्वर शिंदे यांनी प्रस्तावना मध्ये मंचाच्या दोन वर्षांच्या प्रगतिशील वाटचालीचा आढावा घेतला. या काव्य संमेलनात महाराष्ट्राच्या काना कोपर्या मधून आलेल्या कवी/कवियित्री नी आपल्या विविध आशयाच्या,विषयांच्यां कवीता सादर केल्या.तसेंच या काव्यसंमेलना सहभागागी झालेल्या कवी/कवयित्रीना सन्मान चिन्ह,सन्मान पत्र देऊन मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले. काहीच्या कवीता डोळ्यात पाणी आणणार्या होत्या,तर काही विनोदाने हास्याचे फवारे उडविणार्या होत्या.,काही नी कवीता गाऊन सादर केल्या.साधारण या संमेलनात ६०ते७०कवी/कवयित्रिनी भाग घेतला होता.संमेलन अध्यक्ष चंद्रकांतदादा वानखेडे ,उद्घाटक विजयराव वहाडणे,विशेष उपस्थिति विवेकभैया कोल्हे,राजेंद्र जाधव,वासुदेव देसले,अरविंद शेलार,राम गायकवाड़, वनमाला पाटील,सुलभा भोसले,आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते,तर,नाते शब्दांचे साहित्य मंचचे ज्ञानेश्वर शिंदे, पंडित निंबाळकर,बाळा साहेब देवकर,जी.के.ढमाले,सुनिता इंगळे,चंदन तरवडे,आरती कोरडकर,नंदकिशोर लांडगे,विलास नवसागरे,दिपक सोनवणे,यांनी या संमेलन प्रसंगी विशेष परीश्रम केले,अमोल कोल्हे यांनी काव्य संमेलनाचे सुत्रसंचलन खूपच छान केले
भारत कवितके मुंबई मोबाईल ८६५२३०५७००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!