ताज्या घडामोडी

अग्निपथ लष्कर भरती योजना अन्यायकारक – मेहबूब शेख

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : देशात सर्वत्र महागाईने कळस गाठला आहे, तसेच केंद्र सरकारने अन्याय कारक अग्निपथ लष्कर भरती योजना राबवून युवकांची जणू थट्टाच केली आहे. या विरोधात युकांनी पेटून उठण्याची गरज आहे, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथे आज झालेल्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, पेट्रोल, डिझेल, घरघुगती वापराचा गॅस, अन्नधान्यापासून ते दैनंदिन वापराच्या, गरजेच्या वस्तूंचे दर गगणाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील बनले आहे. त्यातच राज्यात जनतेचा विश्वासघाताने अस्तित्वात आलेल्या सकारचा कारभार दूचाकी गाडीवर अवलंबून आहे. त्यामुळे लोकांची कुंचबना होत असून त्याविरोधात युवकांनी पेटून उठले पाहीजे. कोविड-19 काळात आमदार मानसिंगभाऊ नाईक व जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केलेले काम मतदार संघासाठी बहुमुल्य ठरले आहे.
युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक म्हणाले, देशातील 80 टक्के जनता शेतीवर अवलंबून असूनही केंद्र सरकारकडून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. व्यापारी, उद्योजकांचे हित जोपासण्याचे काम मात्र जोमाने सुरू आहे. युवकांच्यावर अन्याय करणारी तिन्ही सैन्यदलात अग्निपथ योजना राबविली जात आहे. सर्वसामान्य, शेतकरी व मध्यमवर्गीयांचे महागाईमुळे जगणं अवघड करून टाकले आहे. या विरोधात सातत्याने आवाज उठवला गेला पाहिजे. त्यासाठी युवकांचे संघटन मजबूत असणे, करणे गरजेचे आहे. राज्यात शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे काम करणारे महाविकास आघाडीचे सरकार विश्वासघाताने पाडून सत्तेत आलेले शिदे-फडणवीस या दोघांचेच सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यातील जनताच त्यांना उत्तर देईल.
प्रारंभी युवकचे तालुकाध्यक्ष हर्षद माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी कृष्णा खामकर, सुनिल तांदळे व मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील-नागराळकर, निखील ठाकरे व नितीन भडकमकर, प्रदेश निरीक्षक अरूण असबे, भुषण नाईक, विश्वासचे संचालक बाबासो पाटील व युवक राष्ट्रवादीचे प्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. आभार उदय पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!