आपला जिल्हाक्राईम न्युज

सराईत गुन्हेगारास साथीदारांसह पिस्टल व रांऊडसह अटक

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई.

Spread the love

सराईत गुन्हेगारास साथीदारांसह पिस्टल व रांऊडसह अटक ; खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई.Sarait criminal accomplice arrested with pistol and rounds; Anti-extortion squad’s bold action

आवाज न्यूज :  पिंपरी चिंचवड प्रतिनिधी ११ नोहेंबर.

मा.पोलीस आयुक्त. विनयकुमार चौबे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.

त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे दिनांक ०५/११/२०२३ रोजी संशयीतांची माहिती काढत असताना, पोलीस हवालदार निशांत काळे, विजय नलगे व पोलीस अंमलदार सुधीर डोळस, यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल माने हा आंबेठाण चौकात, रिक्षा स्टॅण्डजवळ, चाकण चौक येथे थांबलेले असुन, त्याचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहेत अशी बातमी मिळाल्याने, खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून, आरोपी नामे राहुल शहादेव माने वय-२३ वर्षे, रा.अमृत कॉलनी, बालाजीनगर, चाकण, पुणे यास ताब्यात घेवुन,

त्यांच्या ताब्यातुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ राऊंड जप्त करुन, आरोपी विरुध्द चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९२०/२०२३, आर्म ॲक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान त्याचा साथीदार आरोपी तुषार बाबासाहेब मस्के वय-२३ वर्षे रा. हनुमान मंदीरासमोर, गवळवाडी, सराटा, बीड यास अटक करुन, त्यांचेकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्य पुर्ण तपास करुन, त्यांचेकडून ०२ पिस्टल व ०४ राऊंड हस्तगत करुन, जप्त करण्यात आले.

नमूद गुन्हयात आता पर्यंत १,५३,००० /- रुपये किंमतचे ०३ देशी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आलेली आहेत.आरोपी राहुल माने हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, बलात्कार असे गुन्हे दाखल आहे. त्याचेवर मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे.सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप निरीक्षक रमेश गायकवाड, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, चंद्रकांत जाधव, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे व भरत गाडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!