ताज्या घडामोडी

प्रसिद्धीपासून दूर पण प्रशासनात सर्वदूर असलेला अधिकारी – सुनिल मंद्रूपकर

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
बोरगाव ता वाळवा चे सुपुत्र आणि शैक्षणिक प्रशासनातील हुकामी एक्का सुनिल मंद्रूपकर यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे येथे सहाय्यक संचालक ( प्रशासन ) पदी नेमणूक झाल्याने शिराळा, वाळवा तालुक्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. ” अधिकारी कधी लोकप्रिय असता कामा नये. लोकप्रिय राजकारणी लोकांनी असावे ” असं नेहमीच ठासून सांगणारे सुनिल मंद्रूपकर प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिले. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातून त्यांनी गटशिक्षणाधिकारी म्हणून प्रशासनातील काम सुरु केले. राजापूर तालुक्याबरोबरच वैभववाडी , पलूस , शिराळा सह अनेक तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी कामाची छाप पाडली. हातात अदृश्य चाबूक घेऊन त्यांनी काम केले पण या अदृश्य चाबकाचे फटकारे त्यांनी कधी काढले नाहीत. हे फटकारे काढण्याची वेळच त्यांनी येऊ दिली नाही. प्रत्येक समस्या वर त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्याने मात केली. मिश्किलता हा त्यांच्या स्वभावातील ठळक गुण..! गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी गंमतीतील शाळा हेरल्या तर शाळेतील गंमती त्यांनी दिलखुलासपणे मांडत शाळेतील त्रुटीवर बोट ठेवले. या त्रुटी दूर करण्यासाठी तितक्याच प्रभाविपणे काम केले.अधिकारी म्हणून काम करताना राजकीय हस्तक्षेप हा आलाच.चांगला आणि सकारात्मक हस्तक्षेप मान्य करत इतर राजकीय हस्तक्षेपाला त्यांनी खुबीने बगल दिली त्याचबरोबर इतरांच्या कामात त्यांनी स्वतः कधीच हस्तक्षेप केला नाही .
सेवेच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना सहाय्यक संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळतेय. या संधीचेही ते सोने करतील यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!