क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

तमनर आखाडा येथे महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख यांची कुस्ती होणार..

चांदीची गदा व दोन लाख एकावन्न हजार रु. रक्कमेचे बक्षिस

Spread the love

तमनर आखाडा येथे महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख यांची कुस्ती होणार
चांदीची गदा व दोन लाख एकावन्न हजार रु. रक्कमेचे बक्षिस..The great Bharat Kesari wrestler Sikandar Shaikh will be wrestled at Tamnar AkhadaA silver mace and two lakh fifty one thousand rupees. Prize money..

आवाज न्यूज : राहुरी, वार्ताहर, ३ एप्रिल.

तालुक्यातील तमनर आखाडा येथे श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानासाठी जगातील अनेक नामवंत पैलवानांची हजेरी लागणार आहे.

त्यानिमित्ताने श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ तमनर आखाडा यांच्या वतीने कुस्ती मैदान भरविण्यात आले आहे. त्यानिमित्त मैदानात तमनर आखाडा केसरी २०२३ साठी महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध जागतिक विजेता पैलवान अली इराणी (इराण देश) यांची नंबर एक ची कुस्ती घेण्यात येणार आहे. त्यासाठी रक्कम रुपये दोन लाख ५१ हजार व मानाची गदा ठेवण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त इतर चाळीस कुस्त्या पोस्टरवर नेमण्यात आल्या आहे.

सदर मैदानास कुस्ती शौकीनांनी उपस्थित राहण्याची विनंती मंडळाच्या वतीने पैलवान पंढरीनाथ तमनर, संजय तमनर, गंगाधर तमनर, भानुदास तमनर, लक्ष्मण तमनर, रामदास तमनर, बाळासाहेब बाचकर, कौश्याबाप्पू तमनर, शरद तमनर, किशोर तमनर, भानुदास तमनर, संतोष तमनर, गणेश तमनर, रावसाहेब तमनर, देवराम तमनर, गीताराम तमनर, बापू तमनर, निखिल तमनर, किशोर भागवत तमनर, किरण तमनर, ऋषिकेश तमनर, दशरथ पांढरे, शांताराम तमनर, शिवाजी तमनर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!