आरोग्य व शिक्षण

लोणावळा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ते राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने 'सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

लोणावळा : महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचे मार्गदर्शक परिपत्रकानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दि. ०३ जानेवारी २०२२ ते राजमाता जिजाऊ यांची जयंती दि. १२ जानेवारी २०२२ याकालावधीत सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा ह्या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात वेशभूषा, निबंधलेखन, समूहगीत गायन, एकपात्री नाटक, प्रबोधनात्मक व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आज सोमवार दि ०३ जानेवारी २०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. बी. एन.पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरवात केली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय साळुंके यांनी केले. त्यावेळेस त्यांनी सावित्रीबाई फुले लिखित कविता वाचून दाखविली आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी इंग्रजी भाषेची गरज आहे असे मत समाजाला पटवून दिले. कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सविता पाटोळे यांनी आधुनिक काळात मुलींना चूल आणि मूल या दृष्टिकोनातून बाहेर येऊन शिक्षणाचे पंख विस्तारले पाहिजेत असे मत व्यक्त केले. साप्ताहिक अंबर चे उपसंपादक श्री प्रशांत पुराणिक यांनी सावित्रीबाईनी अनिष्ट रूढी-परंपरांना केलेल्या विरोधाबद्दल भाष्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांनी महिला शिक्षण दिनाचे महत्व सांगताना पुण्यातील पहिली शाळा ते साथीच्या रोगाने घातलेल्या थैमानात सवित्रीबांईचे योगदान समर्पक उदाहरणांनी विद्यार्थ्यांसमोर विशद केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या पेहेराव करून क्रांतीज्योतीला अभिवादन केले.यावेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सुनीता पवार, द्वितीय क्रमांक कु. प्रज्ञा साळवी तर तृतीय क्रमांक कु. वैशाखी ओव्हाळ यांना प्रदान करण्यात आले.तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. प्रणाली शिर्के मनोगत व्यक्त केले. कु. तेजल केदार आणि कु. प्रज्ञा चकोर यांनी सर्व उपस्थितांकडून स्त्रीशक्तीच्या गौरवासाठी कार्यक्रमात घोषणांचा वर्षाव केला.

कार्यक्रमाचे आभार प्रा. रोहन वर्तक यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी आवाज न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधी हेमलता कचरे, तसेच प्रा. राहुल सलावदे, प्रा. अँनी वर्गिस, प्रा. धनराज पाटील, प्रा. शशिकला ठाकर, प्रा. दीपक तारे, डॉ. निलेश काळे, प्रा. मनीषा धुतराज, प्रा. वैशाली कचरे आणि प्रा. शिल्पा घरत-वर्तक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!