ताज्या घडामोडी

मराठीचा स्वाभिमान जपा’ -बी. डी. खामकर

Spread the love

‘ मराठीचा स्वाभिम्
मराठी भाषेला समृद्ध करण्याचे कार्य अनेक संत कवी ,साहित्यिक यानी केले. इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले तरी मराठी दुधावरची साय आहे मराठी भाषेतील शब्द गोडवा ,आपुलकी ,निर्माण करणारे आहेत. याच भाषेच्या बळावर मराठी बोलणारी माणसे जगभर विखुरले आहेत .असे प्रतिपादन ग्रंथपाल बि .डी . खामकर यांनी केले.
येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूरच्या पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आयोजित व अग्रणी महाविद्यालय अंतर्गत ‘मराठी भाषा गौरव दिन’ व कवी कुसुमाग्रज जयंती ‘उत्सवात ते बोलत होते.
खामकर म्हणाले ‘जगातील अनेक भाषांपैकी सुंदर भाषा म्हणून मराठी कडे पाहिले जाते अनेक ग्रंथ गीते कार्य करण्यास प्रवाहित करतात. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ व त्यातील आचार विचार मंत्रमुग्ध करतात .असे अनेक साहित्य मराठीत आहेत ते ज्ञान विद्यार्थ्यांनी वेचले पाहिजे मराठी भाषेत अनेक रोजगाराच्या संधी आहेत .मुलांना मातृभाषेतून जास्तीत जास्त शिकले पाहिजे तसेच ग्रंथालयाने अनेक ग्रंथ संवर्धन करून वाचण्यासाठी लोकांना प्रेरित करावे .बदललेल्या शासकीय धोरणाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मातृ भाषेतून घेतलेली शिक्षण ही व्यक्तीला समृद्ध बनवते, म्हणून सर्वांनी मायबोली मराठीचा आग्रह धरला तर मराठीला ऊर्जित अवस्था येईल’.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य . डॉ.अंकुश बेलवटकर उपस्थित होते आपल्या मनोगतात ते म्हणालेकी ,’मराठी भाषा व्यक्त होण्याचे साधन आहे. त्यातून आपण व्यक्त होणे आवश्यक आहे .आपण आपली मायबोली समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील व कृतिशील राहिले पाहिजे. कॉलेजमधील मासिकेतून अनेक लेख ,कविता ,वैचारिक विचार मांडले पाहिजेत .त्यासाठी मराठी साहित्य जास्तीत जास्त वाचले पाहिजे .येणाऱ्या काळात मराठीला वैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहे’. असे मत त्यांनी व्यक्त केले .
कु.अमृता थोरात व वैष्णवी कदम यांनी मराठी वरील अभिमान गीत सादर केले. कु. अमृता थोरात स्नेहल खांबे ,ऋतुजा जाधव, पूनम देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रमुख उपस्थित प्रो.डॉ.स्नेहल हेगिश्टे प्रा. डॉ. संजीवनी पाटील,प्रा.डॉ. वर्षा पाटील, प्रा. डॉ. वृषाली पाटील, प्रा. डॉ.राम. घुले,
प्रा.सुप्रिया कांबळे,प्रा.रविराज सूर्यगंध,प्रा. श्रेणिक मासाळ,प्रा.श्रीकांत जाधव इ. प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक प्रो. डॉ.शीला रत्नाकर यांनी केले. आभार प्रा. रविराज सूर्यगंध यांनी मानले.प्रा. संजय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!