ताज्या घडामोडी

नुसते रामनाम नको, अस्वच्छता जातीयतेचा रावण जाळा -सतीश भिडे

Spread the love

पालघर प्रतिनिधी
रात्र वैऱ्याची आहे म्हणून वेळ फुकट न दवडता, रामनामाच्या जपा बरोबर अस्वछतेचा -जातीयतेचा रावण जाळणे गरजेचे आहे असे आवाहन स्वा. वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी केले आहे.

वापी येथील महात्मा फुले शाळेत गीत वीर विनायक कार्यक्रम सादरकरतेवेळी तरुणांनी आता मानवतेचा खरा शत्रू कोरोनास नष्ट करण्यासाठी स्वच्छता हा श्वास तर सर्वधर्मसमभाव हाच ध्यास मनी जपण्याचे आवाहनही भिडे ह्यांनी केले.

यावेळी जेष्ठ सामाजिक नेते विनोद कदम,अरुण पावसे,रुपाली बऱ्हाटे कार्यक्रमास उपस्थित होत्या. प्रसिद्ध ढोलकीवादक हरिभाई झानजे ह्यांनी कार्यक्रमास साथ संगत केली. सोशल डिस्टंसिन्गचे पालन करून सादर झालेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!