आंदोलनमावळ

पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेला विरोधासाठी वडगाव येथे तहसिलदार कचेरीवर सर्वपक्षिय आंदोलन..

श्रीएकविरा कृती समितीचा पाठिंबा.

Spread the love

पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेला विरोधासाठी वडगाव येथे तहसिलदार कचेरीवर सर्वपक्षिय आंदोलन ; श्रीएकविरा कृती समितीचा पाठिंबा.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,१५ सप्टेंबर.

पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेला विरोधासाठी वडगाव येथे तहसिलदार कचेरीवर सर्वपक्षिय आंदोलन शुक्रवारी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.आंदोलन ग्रामदैवत श्रीपोटोबा महाराजांना पुष्पहार घालून सुरू होईल. या आंदोलनाला कार्ल्यातील श्रीएकविरा कृति समितीतर्फे जाहीर पाठिंबा दिला आहे.

 

श्रीएकविरा कृति समितीचे निवेदनावर संस्थापक अध्यक्ष भाई भरत मोरे, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, कृती समिती अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, उपसरपंच किरण हुलावळे, माजी सरपंच गुलाब तिकोणे, नंदकुमार पदमुले, आदींच्या सह्या असून निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठविल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!