आरोग्य व शिक्षण

तळेगावात रेशन दुकानात पक्षांची विष्ठायुक्त धान्याचे वाटप; गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ

Spread the love

तळेगाव  : येथील रेशन दुकानात वाटप होणा-या धान्यात पक्ष्यांची विष्ठा, पिसे, पोरकिडे आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.

मार्च महिन्याच्या शिधा वाटपातील धान्य कचरा युक्त असून खाणे योग्य नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.कोरोना काळात आर्थिक संकटात आलेले नागरिक स्वस्त धान्य योजनेतील शिधा वाटपावर अवलंबून असताना पक्ष्यांची विष्ठायुक्त धान्य वाटप करून गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.

या संदर्भात तक्रारी प्राप्त होताच हे निकृष्ट धान्य तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या समोर होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे  अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन समिती तळेगाव दाभाडे शहरच्या वतीने करण्यात आली.

 

यावेळी तळेगाव शहर अध्यक्ष राजेश बारणे, उपाध्यक्ष नवनाथ कुल, कार्याध्यक्ष दिलीप चौधरी, पुणे जिल्हा संघटक अरुण माने, तालुका कार्याध्यक्ष समीर नालबंद उपस्थित होते.

विष्ठा युक्त धान्य वाटप निदर्शनास आणून दिल्यावर रेशनिंग दुकानांची त्वरित तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिले. त्याचबरोबर स्वस्त धान्य वाटप दक्षता समितीच्या आज संपन्न झालेल्या पहिल्याच बैठकीत या विषयावर उहापोह झाल्याची माहिती मिळत आहे. गोरगरीब जनतेसाठी वाटप होणाऱ्या स्वस्त धान्य योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून मोफत धान्यापासून लाभार्थींना विविध कारणे देऊन वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!