आरोग्य व शिक्षण

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्या – पालकमंत्री छगन भुजबळ यांचे पोलीस प्रशासनास आदेश

फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

Spread the love

नाशिक: जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देत. त्यांना दिलासा मिळवून द्यावा असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ग्रामीण पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी,चांदवड, निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत परिस्थिती समजून घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी संतोष आहेर, शरद मालसाने, रघुनाथ पाटील, सुनील शिंदे, त्र्यंबक कडलग, मधुकर मालसाने, हिरामण कदम, दौलत मालसाने यांच्यासह दिंडोरी, निफाड,चांदवड व त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२०-२१ या हंगामातील दिंडोरी, निफाड, चांदवड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पाडवा ऍग्रो सोल्युशन या एक्सपोर्टर कंपनीकडून अडीच कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक करण्यात आलेली आहे. याबाबत विविध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे. मात्र अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसून शेतकरी वर्गाला दिलासा देण्यात यावा असे म्हटले आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो नवीन कायदा करण्यात येत आहे. त्या कायद्यात शेतकऱ्यांची जे फसवणूक करणारे एक्सपोर्टर असतील किंवा स्थानिक व्यापारी यांनी फसवणूक केल्यास त्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी. तसेच व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांचे पैसे लवकर मिळावे यासाठी तरतुद करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!