आरोग्य व शिक्षण

किनारा वृद्धाश्रमात मकर संक्रांत उत्साहात साजरी

Spread the love

कामशेत : येथील आहिरवडे मधील किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्ट मध्ये मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. घरापासून लांब असणाऱ्या वृद्ध आजी – आजोबांनी एकमेकांना तिळगूळ देत सणाचा आनंद घेतला. मागील बारा वर्षापासून शासनाची मदत न घेता वृद्धाश्रम चालू आहे. आत्तापर्यंत 62 वृद्धांना आश्रमाने सामावून घेतले आहे

 

 

आजचा दिवस काही खासच ठरला…सकाळी सकाळीच सर्व आजी आजोबांची मकर संक्रांतीच्या तयारीची लगबग सुरु झाली..तिळगुळाचे लाडू, वड्या व विशेष आकर्षण पतंगांचे होते..आवड असणा-या व नसणा-या आज्जींनी देखील आज साड्या नेसण्याचा आग्रह धरला… गळ्यात माळा घातल्या….

आजोबांचा तर थाट काही औरच! आज सर्व आजोबातर हिरोच दिसत होते…पतंग उडवण्याची तयारी सुरु झाली..पतंगीवर काही आजोबांनी “किनाराचे” नाव लिहीले…. सर्वजण बाहेर पटांगणात जमा झाले…पतंग जशी ऊंच ऊंच जात जात होती तसा सर्व आजी आजोबांचा उत्साह देखील वाढत होता…काही आजींचे तिळगुळ घ्या!गोड गोड बोला हे बोबडे व गोड बोल ऐकत रहावेसे वाटले..ऐकू व बोलू न शकणा-या मालू आजींनी त्यांच्या सुंदर हास्याने शुभेच्छा दिल्या….जगापासून अनेक वर्षे लांब रहाणा-या आजी आजोबांना “किनारा”ह्या एकत्र कुटूंबात आता एकटे वाटत नाही…त्यांच्या चेह-यावरचे हास्य एकमेकांना पुन्हा नव्याने आयुष्य जगायला शिकवतं! अशा या “किनारा परिवारातर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!