ना. जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गृहोपयोगी वस्तू भांडारचा शुभारंभ
नेर्ले (ता. वाळवा) येथे शुभंम पाटील, निवास माने व वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. ना. जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गृहोपयोगी वस्तू भांडारच्या शुभारंभ वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला ,या कार्यक्रमास सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी भेट दिली, यावेळी कृष्णा कारखाना माजी संचालक दिलीप पाटील वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी सदस्य शुभंम पाटील नेर्ले ग्रामपंचायत सदस्य निवास माने अनिल साळुंखे युवा उद्योजक रोहित पाटील माजी उपसंरपच प्रकाश माने जयकर माने सागर रणखांबे विवेक शहा सुधीर माने उपस्थित होते ह्या गृहोपयोगी वस्तू भांडारच्या लकी ड्रॉ मध्ये नेर्लेच्या सुचिता संपतराव विरकर यांना पैठणी मिळाली ,कार्यक्रमास गावातून मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होते.