आरोग्य व शिक्षण

पिंपरी चिंचवड शहरात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

Spread the love

चिंचवड : विश्वकर्मा जयंती पिंपरी चिंचवड शहरात विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील वैश्य सुतार समाज, मेवाडा सुतार समाज, गुर्जर क्षत्रिय समाज, जांगीड सुतार समाज बांधवांनी स्वतंत्र्यरित्या वेगवेगळ्या भागात विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करून उत्साहात साजरी केली.

निगडी येथे वैश्य सुतार पुना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, विश्वकर्मा युवा मंडळाचे अध्यक्ष नितीन सिंसागीया, गुर्जर क्षत्रिय कडीया समाजाचे अध्यक्ष शैलेश टांक यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचे उपस्थित बांधवांना वाटप करण्यात आले.

यावेळी विपूल वाढीया, राजेश चुडासमा, जयेश वाडोदरीया, जयश्री मकवाना, धर्मेश पिंपलिया, हितेश रानपरीया, अमित सिंसागीया, जयंत पिपालिया, रषेश पिंपालिया, चिराग गढीया, अमित रानपरिया आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!