आपला जिल्हाराजकीय

विनम्र स्वभावाच्या रामदास काकडेंमुळे काँग्रेस पक्षांमध्ये नवचैतन्य.. पै.चंद्रकांत सातकर.

ऐतिहासिक व पारंपारिक परंपरा असणाऱ्या काँग्रेस पक्षामध्ये रामदास काकडे पुन्हा सक्रिय..

Spread the love

विनम्र स्वभावाच्या रामदास काकडें मुळे काँग्रेस पक्षांमध्ये नवचैतन्य.. पै.चंद्रकांत सातकर.New consciousness in Congress parties due to humble nature Ramdas Kakade.. Pai. Chandrakant Satkar.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १९ जुलै.

उच्चशिक्षित, बहुआयामी व्यासंगी व विनम्र स्वभावाच्या रामदास काकडे यांच्या स्वभावामुळे सर्वच घटकातील कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्याची उमेद निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष. पैलवान चंद्रकांत सातकर यांनी केले आहे.प्रत्येक क्षेत्रामध्ये रामदास काकडे यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा निर्माण केल्यामुळे त्यांची कामाची विशिष्ट पद्धत रुजू झाली आहे त्याचाच फायदा मावळ तालुक्यातील विकास कामांमध्ये भविष्यात होईल असे सातकर यांनी नमूद केले.

राजकारणात अनेक चढ-उतार येत असतात परंतु तालुक्यातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विनम्रतापूर्वक कार्य केल्याने पक्षाचे नाव मोठे होते असे प्रतिपादन यावेळेस मावळ तालुका अध्यक्ष. यशवंत मोहोळ यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाचा इतिहास फार मोठा आहे, देशाच्या राज्याच्या व तालुक्याच्या जडणघडणीमध्ये काँग्रेस पक्षाचा फार मोठा वाटा आहे, आशा ऐतिहासिक व पारंपारिक परंपरा असणाऱ्या काँग्रेस पक्षामध्ये रामदास काकडे पुन्हा सक्रिय झाल्यामुळे तळेगाव दाभाडे परिसरामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

तळेगाव स्टेशन येथे मावळ तालुका काँग्रेस कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी पै.चंद्रकांत सातकर, प्रांतिक सदस्य ॲड दिलीप ढमाले, मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. यशवंतराव मोहोळ, तालुका कार्याध्यक्ष ॲड .खंडू तिकोने, मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते. मिलिंद अच्युत, मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश वाघोले, तळेगाव स्टेशन युवक काँग्रेस अध्यक्ष. समीर दाभाडे, तळेगाव स्टेशन काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे, युवक काँग्रेस कमिटीचे सदस्य सोहेल उर्फ छोट्या मुलानी, तळेगाव स्टेशन काँग्रेस कमिटीचे सदस्य दत्ता पारगे, जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!