आरोग्य व शिक्षण

हनुमान चालिसा पाठाने मंत्रमुग्ध झाला श्री पोटोबा मंदिर परिसर

Spread the love

वडगांव मावळ : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले वडगांव चे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान, मंदिर मध्ये श्री सालासर हनुमान चालिसा मंडळ ,पुणे यांचे वतीने,प्रति वर्षाप्रमाणे ,महाशिवरात्री ते हनुमान जयंती पर्यंत, संगीतमय हनुमान चालिसा पठणाचे भक्तिमय कार्यक्रम अनेक धार्मिक स्थळीं संपंन्न होत असताना या वर्षी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर या ठिकाणी या संगीत भक्तिमय कार्यक्रमाचा योग आल्याने ,संपूर्ण मंदिर परिसर व भाविक भक्तजन या हनुमान चालिसा पठणाने मंत्रमुग्ध झाले.

एकूण दीड तासाच्या या संपूर्ण कार्यक्रमात (11)अकरा प्रकारच्या,चालींचे स्वरूप देऊन हनुमान चालिसा गायन करण्यात आलेश्री सालासर हनुमान चालिसा मंडळाचे प्रमुख दीपक कासट,यांचा देवस्थान चे वतीने विश्वस्त सचिव अनंता कुडे यांनी सन्मान केला

यावेळी नगराध्यक्ष, मयूर ढोरे,विश्वस्त तुकाराम ढोरे,सुनीता कुडे,नगरसेवक किरण म्हाळसकर,भूषण मुथा, प्रसाद पिंगळे, विश्वहिंदू परिषद वडगांव मंडलाचे प्रमुख,मोरेश्वर पोफळे, ह भ प मधुकर पानसरे, विठ्ठलराव ढोरे देवस्थान चे पुजारी मधुकर गुरव,सुरेश भंडारी लायन्स क्लब चे अध्यक्ष दिलीप मुथा , संतोष चेट्टी,मा ग्रा प सदस्य सोमनाथ धोंगडे, संतोष ढमाले,आदिंसह असंख्य भाविक उपस्थित होते.

वडगांव मध्ये आयोजक संजय भंडारी यांनी सदर मंडळाचे स्वागत केले.मावळ माहेश्वरी समाजाचे वतीने अध्यक्ष उमेश भुतडा व सचिव चंद्रशेखर जाजू यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!