आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

२ फेब्रुवारी हा दिवस “World Wetland Day” म्हणून जगभर साजरा केला जातो.

फ्रेंड्स ऑफ नेचर" व त.दा.न.प. यांचे संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी तळेगावचे MSEBजवळील तळे येथे पाणवठ्या साठी पोषक व तेथील जलचर, पाणपक्षी व ईतर पाणवठ्याशी सलग्न जिवसृष्ठी यांना ऊपयुक्त अशा रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले..

Spread the love

२ फेब्रुवारी हा दिवस “World Wetland Day” म्हणून जगभर साजरा केला जातो.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, ३ जानेवारी.

याच निमित्ताने “फ्रेंड्स ऑफ नेचर” व त.दा.न.प. यांचे संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी तळेगावचे MSEBजवळील तळे येथे पाणवठ्या साठी पोषक व तेथील जलचर, पाणपक्षी व ईतर पाणवठ्याशी सलग्न जिवसृष्ठी यांना ऊपयुक्त अशा रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

शमी, बेल, खैर, बाभुळ, अशी ७० रोपे पहिल्या टप्प्यात आज सकाळी ८ ते ११ या वेळेत लावण्यात आली.
या तळ्यावर पूर्वी युरोपवरून तलवार बदके हजारोंच्या संखेने येत असत व ईतरही अनेक पाणपक्षी मोठ्या संख्येत दिसायचे. डाॅ सलीम अली येथे नेहमी पक्षी निरीक्षणासाठी येत असत.एप्रिल २०२३ मधे “फ्रेंड्स ऑफ नेचर” चे रौप्यमोहोत्सवी वर्ष सुरू होत आहे व या निमित्ताने या तळ्याला पुर्वीचे, पक्षीवैभव,  प्राप्त करून देण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचा निर्धार संस्थेने केला आहे.
पाण्याची गुणवत्ता सुधारावी या साठी येथे ५० फूट कारंजे लोकसहभागातून ऊभारण्याच्या तदानपा च्या प्रस्तावास फ्रेंड्स ऑफ नेचर ने भरीव अर्थसहाय्य केले आहे. कारंजे साठी काॅन्ट्रॅक्टर व त.दा.न.पा. कर्मचारी यांचे ही अर्थसहाय्य मिळाले.

मुख्याधिकारी. सरनाईक यानी फ्रेंड्स ऑफ नेचर ने याकामी पुढाकार घेतल्याबद्दल आभार मानले. संस्थापक महेश महाजन यांनी या ठिकाणी भविष्यात भेळपुरी गाडे, चौपाटी, होऊ न देता संपूर्ण नैसर्गिक परीसरच ठेवावा अशी त.दा.न.पा. स विनंती केली. अध्यक्ष निरज शाही यांनी प्रास्ताविक केले,सचिव निशिकांत पंचवाघ यानी आभार मानले. तदानपा वृक्षअधिकारी सिद्धेश्वर महाजन, रणजीत सुर्यवंशी , तसेच संस्थेचे सुधाकर मोरे, दिपक शिरसाठ व सर्व सदस्य यानी वृक्षारोपणात भरीव योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!