ताज्या घडामोडी

आधिकारी वर्गाला लोकशाहीची भीतीच राहिली नाही” खासदार गोपाळ शेट्टी.

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली
कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभा मध्ये मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका (पुल विभाग) आर/दक्षिण विभागा तर्फे मंगुभाई दत्तानी विस्तारीत पोयसर नदीवरील पुलाचे उद्घाटनप्रसंगी उद्घाटक भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते पार पडला.भाजपा वार्ड क्रमांक २१च्या नवतरुण मित्र मंडळ मार्फत लालजी पाडा (पोलीस चौकी) ते कांदिवली पश्चिम शेअर रिक्षा स्टैंड चे उद्घाटन भाजपा खासदार गोपाळ शेट्टी व भाजपा आमदार योगेश सागर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर वार्ड क्रमांक ३१ मधील न्यू लिंक रोड पूर्ण पुष्टीकरण व पावसाळी गटार बनविण्याच्या कामाचा भूमी,पूजन समारंभ पार पडला. या तीनही कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा खासदार गोपाळ शेट्टी व आमदार योगेश सागर यांचे हस्ते पार पडला. या प्रसंगी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले,” आधिकारी वर्गाला लोकशाहीची भीती राहिलेली नाही.आधिकारी काम करीत नसेल तर मग खासदार, आमदार नगरसेवक यांनाजनतेची कामे करावी लागतात,एक समारंभात एक नगरसेविका असे म्हणते की,मुंबई महानगर पालिकेत आयुक्त,सहायक आयुक्त,उपायुक्त, यांची संख्या खूपच आहे पण जनतेचा उपयुक्त मात्र कुणीच नाही. ” या प्रसंगी आमदार योगेश सागर, सहायक आयुक्त आर दक्षिण ललित तळेकर उपायुक्त परीमंडळ ७ भाग्यश्री कापसे,उपप्रमुख अभियंता पुले पश्चिम उपनगरे कल्पना राऊळ,अभियंता गांधी,सुनिल बेंद्रे,भाजपा उतर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, भाजपा चारकोप विधानसभा अध्यक्ष व मा.नगरसेवक बाळा तावडे, मा.नगरसेवक कमलेश यादव, नगरसेविका लिना देहेरकर,मा.नगरसेविका प्रतिभा गिरकर, आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रसंगी पत्रकार साहित्यिक भारत कवितके, संजय सिंह, रेशमाताई टक्के, आर.एस.वर्मा,दिनेश सिंह, प्रमोद घाग,प्रमोद गुजर,महेन्द्र यादव,सुनिल कदम,अफजलखान, मुकेश चौधरी,विवेक हडकर,,शाहीद खान,व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा च्या या तीन्हीही कार्यक्रमा साठी विभागातील पुरुष, महिला व विद्यार्थि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!