आरोग्य व शिक्षण

अपक्ष गटनेते कैलास बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Spread the love
पिंपरी : येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अपक्ष गटनेते कैलास भालचंद्र बारणे  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्ष कार्यालयात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कैलास बारणे यांचा पक्ष प्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी व्यक्त करून बारणे यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते संतोष नागुभाऊ बारणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, अभय मांढरे हे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!