आपला जिल्हासामाजिक

चऱ्होली तील हिंदू-मुस्लीम ग्रामस्थांनी एकत्रित स्वातंत्र्य दिन साजरा करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली.

मुलाणी मस्जिदच्या प्रांगणात प्रभातफेरी मध्ये सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षकवृंदाचे व समस्त ग्रामस्थांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले.

Spread the love

चऱ्होली तील हिंदू-मुस्लीम ग्रामस्थांनी एकत्रित स्वातंत्र्य दिन साजरा करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली.Hindu-Muslim villagers of Charholi created national unity by celebrating Independence Day together.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी, १६ ऑगष्ट .

अहेले सुन्नत्वल जमात मुलाणी मस्जिदच्या प्रांगणात 76 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने श्री वाघेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुलाणी मस्जिदच्या प्रांगणात प्रभातफेरी मध्ये सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षकवृंदाचे व समस्त ग्रामस्थांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले. श्री वाघेश्वर विद्यालयाच्या स्काउट टीम व बॅन्ड पथकांनी ध्वजाला सलामी दिली.

त्यानंतर निवृत्त पोलिस अधिकारी तात्या साहेब तापकीर (पाटिल) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदरप्रसंगी माजी महापौर नितिन आप्पा काळजे, नगरसेविका सुवर्णाताई बुर्डे, प्राचार्य धावडे सर, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सिराज मुलाणी, ह.भ.प.भानुदास महाराज तापकीर, ह.भ.प.अशोक महाराज ढोरजे, उल्हासराव काटे, गुलाबराव ताजणे, प्रा.बी.एन चव्हाण व इतर समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महमंदशरीफ मुलाणी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिराज मुलाणी, वसिम मुलाणी, शहीद मुलाणी, इमाम मुलाणी, जमिर मुलाणी, अकबर मुलाणी, रफीक इनामदार, मुबारक पठाण, अय्युब शेख, उस्मान तांबोळी, पठाण सर यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!