Puneसामाजिक

नवीन संसद भवनच्या निर्मितीसाठी ज्यांनी कष्ट घेतले असे विनायक देशपांडे (टाटा प्रोजेक्ट्स चे मुख्य सल्लागार)यांचा स्वातंत्र्य दिनी सन्मान..

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या वास्तुच्या निर्मितीचे ऑडिओ विज्युअल प्रेसेंटेशन विनायक देशपांडे यांनी दिले.

Spread the love

नवीन संसद भवनच्या निर्मितीसाठी ज्यांनी कष्ट घेतले असे विनायक देशपांडे (टाटा प्रोजेक्ट्स चे मुख्य सल्लागार)यांचा स्वातंत्र्य दिनी सन्मान..Independence Day Tribute to Vinayak Deshpande (Chief Consultant of Tata Projects) who worked hard for the construction of the new Parliament House.

आवाज न्यूज पुणे प्रतिनिधी, १६ ऑगष्ट.

15 ऑगस्ट,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या दृष्टीने खूप महत्वाचा दिवस ठरला. नुकत्याच उदघाटन झालेल्या नवीन संसद भवन च्या निर्मितीसाठी ज्यांनी अपार कष्ट घेतले, एक राष्ट्र कार्य समजून या वास्तुची निर्मिती करुन देशासाठी आपले योगदान दिले , ती वास्तू निर्माण करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे, विनायक देशपांडे (टाटा प्रोजेक्ट्स चे मुख्य सल्लागार) याचा सन्मान करण्याचे भाग्य पुणे जिल्ह्याला लाभले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या वास्तुच्या निर्मितीचे ऑडिओ विज्युअल प्रेसेंटेशन  विनायक देशपांडे यांनी दिले. ज्यामध्ये प्रामुख्याने जुनी व नवीन संसद भवन या वास्तुच्या रचनेमधील तांत्रिक दृष्ट्या असलेला फरक, भव्य असे 6,20,000 चौ फीट नवीन संसद भवन चे बांधकाम, लोकसभा, राज्यसभा, संसदेच्या नवीन इमारतीत लाउंज, लायब्ररी, कॉन्स्टीट्युशन हॉल, या अद्यावयत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे. वास्तू निर्माण करताना घेतलेल्या वेदांचा, उपनिषदांचा, 5,000 वर्षे जुन्या भारतीय संस्कृतीचा आधार, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, फूल कमळ यावर आधारित लोकसभा, राज्यसभा यांची अंतर्गत इंटिरियर संकल्पना, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

संसद भवनाच्या शिरपेचात रोवलेला अभिमानाचा सिंहस्तंभ भारताच्या अध्यात्मिक व आधुनिक प्रगतीचे प्रतीक दर्शवतो.
कोविड काळातील अनेक संकटे, निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती यावर मात करत विक्रमी 26 महिन्यात बांधकाम पूर्ण करण्यात आले.

आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी वैयक्तिक घातलेले लक्ष, वेळोवेळी सर्व टीम चे त्यांनी वाढवलेले मनोबल, यामुळे हा प्रोजेक्ट अतिशय नियोजनबद्ध ठरला.

डॉ गोविंद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर ब्राह्मण च्या दृष्टीने महासंघ घेत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिल्पा महाजनी यांनी सूत्रसंचालन केले, केतकी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर मंदार रेडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला,विवेक कानडे यांनी आभार मानले.

प्रेक्षकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद, शिस्तबद्ध कार्यक्रमाचे व वेळेचे नियोजन या गोष्टींनी कार्यक्रम यशस्वी केला. महासंघाने आतापर्यंत घेतलेला एक आगळा वेगळा असा कार्यक्रम म्हणता येईल.

या कार्यक्रमाला, सत्यजीत कुलकर्णी, विजय शेकदार,सचिन टापरे, कमलेश जोशी, विकास अभ्यंकर, राहुल जोशी, अमोघ व ऋचा पाठक, तेजस फाटक, माधव तिळगूळकर, विवेक व मंजुषा खीरवडकर, जयश्री घाटे, शैला सोमण,विकास कुलकर्णी, मैथिली जोशी,दीपक महाजनी,सानिका व अजित खरे, हेमंत व अमेय कासखेडीकर, श्रीकांत क्षीरसागर, किरण काळे, नितीन फडणीस, विश्राम देव, दत्तात्रय देशपांडे इ. पदाधिकारी उपस्थित होते.

या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन वारजे – कोथरूड – पौड रोड शाखेतर्फे करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!