अध्यात्मिकआरोग्य व शिक्षणसामाजिक

राजगुरव नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील श्री गणेश मंदिरात ध्वजारोहण कार्यक्रम साजरा’..

जैन मुनि श्री हिरसागरजी हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक तसेच कारगिल वीर  सुनील रामचंद्र भोसले यांना सत्कारअर्थी म्हणून आमंत्रित केले होते.

Spread the love

तळेगाव स्टेशनच्या शांतीनाथ जैन मंदिरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ध्वजारोहण समारंभ साजरा”Flag Hoisting Ceremony Celebrated’ at Shantinath Jain Temple of Talegaon Station on the occasion of Independence Day

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ ऑगष्ट.

 

राजगुरव नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील श्री गणेश मंदिरात ध्वजारोहण कार्यक्रम राजगुरव नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांनी आयोजित केला होता.जैन मुनि श्री हिरसागरजी हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक तसेच कारगिल वीर  सुनील रामचंद्र भोसले यांना सत्कारअर्थी म्हणून आमंत्रित केले होते.कॉलनीतील जेष्ठ नागरिक  दिवाकरजी शेवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

जैन मुनीवर श्री हिरसागरजी जाज्वल्य देशभक्तीचे विचार व कारगिल वीर मेजर सुनील रामचंद्र भोसले याचा प्रत्यक्ष युद्धभूमी वरील अनुभव ऐकण्यासाठी कॉलनीतील सर्व रहिवाशी व स्टेशन परिसरातील शेकडो जैन बंधू भगिनी व माता पिता उपस्थित होते.श्री शांतीनाथ जैन मंदिर परिसारात साधुजी श्रीमुनि हिरसागरजी म.सा. च्या मुख्य अतिथीत देशभक्तीचा, ध्वजरोहणाचा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शेकडो जैन बांधव, जैन सकल संघ, नुतन ट्रस्ट मंडळ, श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभ शांती विहार सेवा ग्रुप, श्री जैन महिला मंडळे हे उपस्थित होते.

यानंतर राजगुरव नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नव्याने स्थलांतरित झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन कॉलनीतील दानशूर ज्येष्ठ माता श्रीमती गुणे काकू यांच्या हस्ते झाल्यानंतर राजगुरव नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यास सर्व सभासद सहपरिवार उपस्थित होते.
नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या संचालकांचा सत्कार व सोसायटीच्या हिताचे अनेक विषय सभेत पारित झाले. शेवटी स्नेहभोजन होऊन कार्यक्रम संपला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!