ग्रामीणमावळ

औंढोलीत सुमारे ११० मीटरचा रस्त्याचे कामाला मिळाला तीन महिन्यांनी मुहूर्त.

Spread the love

औंढोलीत सुमारे ११० मीटरचा रस्त्याचे कामाला मिळाला तीन महिन्यांनी मुहूर्त.About 110 meters of road work was completed in Aundholi after three months.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,१८ ऑगष्ट..

औंढोलीत सुमारे ११० मीटरचा रस्त्याचे कामाला मिळाला तीन महिन्यांनी मुहूर्त मिळाला आहे. मे , जून २३ मधे मारूती मंदिर ते गुरूनाथ तुकाराम मांडेकर ( पोलिसपाटील ) यांचे घरापर्यतचा सुमारे शंभर ते ११० मीटर लांबीचे रस्त्यासाठी तेरा लाखांचा निधी आमदार सुनिल शेळके यांचे निधीतून मिळाला.

ता.६जून रोजी आई श्रीएकविरा देवीला पूजा व अभिषेक करून पुन्हा विकासकामांना शुभारंभ करणारे आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी दिलेल्या निधीतून हा काँक्रीटीकरण रस्ता पहिला कच्चा माल टाकून तीन महिने लोटले . ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी नंतर लक्षच न दिल्याने पाऊस सुरू झाला.त्यात काम करणे शक्य नसल्यामुळे ते काम रखडले होते.

या कामाकडे लक्ष देवून काँक्रीटीकरण लवकर मार्गी लावावे , आशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली होती. काम अपूर्ण राहिल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती.
आज ठेकेदार आणि ग्रामपंचायतीचे सहमतीने थोडा पाऊस उघडल्यानंतर आरएमसी चे सिमेंट मिक्सर मशीन आणून हे काम सुरू करण्यात आले.

यावेळी सरपंच अरूण चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य संदेश मांडेकर , ग्रामपंचायत सदस्या .मृणाल मांडेकर यांचे पती नवनाथ मांडेकर , ग्रामपंचायत कर्मचारी मोरेश्वर मांडेकर , तसेच कार्यकर्ते तुषार मांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!