ताज्या घडामोडी

ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमात प्रा. प्रकाश माळी यांना निर्भीड पत्रकार सन्मानपत्र प्रदान

Spread the love

महाराष्ट्र पत्रकार संघ ठाणे जिल्हा व ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्प स्कुलच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षकांसाठी सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम २०२२ आयोजित करण्यात आला.यावेळी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा.अजय तिडके यांनी सायबर क्राईम व सायबर सुरक्षा याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.सायबर तज्ञ रॉंनी बडणं
व सायबर तांत्रिक सल्लागार राजेश कांबळे यांनीही मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमात शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना यांच्या वतीने महाराष्ट्र पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.प्रा.प्रकाश माळी यांच्यासह जिल्हाध्यक्ष डॉ.राज परब,राज्य उपसंपर्क प्रमुख राजेंद्र गोसावी,पत्रकार संघाचे पदाधिकारी डॉ.ज्योती परब,सौ.रुची पारकर,सौ.प्रणाली गिरी,श्री. ज्ञानेश्वर पाटील,विजय जाधव,सुभाष जैन,रविंद्र औटी,निशिकांत महांकाळ यांना शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे ठाणे शहर प्रमुख मा.गणेश तांबे व पोलीस उपनिरीक्षक मा.अजय तिडके यांच्या शुभहस्ते *निर्भीड पत्रकार* सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रकाश माळी सर यांनी तर आभार प्रदर्शन संकल्प स्कुलचे संदीप सरांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!