ताज्या घडामोडी

शिराळा नगरपंचायत आयोजित वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा नगरपंचायतीने घरोघरी तिरंगा अभियान राबविले असून सदर अभियाना अंतर्गत शिराळा शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा वक्तृत्व स्पर्धा दिनांक 13/08/2022 रोजी विश्वासराव नाईक कला वाणिज्य व बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय, शिराळा येथे आयोजित करण्यात आल्या. विश्वासराव नाईक कला वाणिज्य व बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाचे उप प्राचार्य मा. श्री. आर.एस कदम यांच्या हस्ते परिक्षक श्री.विलास निकम, श्री. अशोक कुंभार व सौ. ज्योती जोशी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करुन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.या स्पर्धेमध्ये नगरपंचायत मार्फत देण्यात आलेल्या विषयास अनुसरुन लहान गट व मोठा गटामध्ये स्पर्धा घेणेत आल्या त्यामध्ये शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयाचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत लहान गटात 10 स्पर्धेक व मोठ्या गटामध्ये 6 स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचा निकाल तात्काळ घोषित करुन शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.योगेश पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे-
लहान गट -1) सायली संपत आलुगडे (प्रथम क्रमांक) श्री शिव छत्रपती विद्यालय,शिराळा , 2) सृष्टी विलास निकम (द्वितीय क्रमांक) सदगुरु आश्रम शाळा शिराळा 3) मयुर ब्रम्हानंद मुंडे (तृतीय क्रमांक) न्यू इंग्लिश स्कुल शिराळा
मोठा गट -1) श्रृतिका प्रदिप पाटील (प्रथम क्रमांक) न्यू इंग्लिश स्कुल शिराळा 2) प्राची प्रकाश माने (द्वितीय क्रमांक) न्यू इंग्लिश स्कुल, शिराळा 3) जनाबाई सुरेश खरात (तृतीय क्रमांक)सदगुरू आश्रम शाळा,शिराळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!