ताज्या घडामोडी

इस्लामपूर ता १७मागासवर्गीय व मागास आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी जात पडताळणी पासून वंचित राहू नये यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने राबवलेल्या उपक्रमाचा लाभ विद्यार्थी वर्गानी घ्यावा

Spread the love

प्रथमेश क्षीरसागर- इस्लामपूर प्रतिनिधी
इस्लामपूर ता १७मागासवर्गीय व मागास आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी जात पडताळणी पासून वंचित राहू नये यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने राबवलेल्या उपक्रमाचा लाभ विद्यार्थी वर्गानी घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे उपायुक्त खुशाल गायकवाड यांनी व्यक्त केले येथील विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज व समाज कल्याण विभाग सांगली यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव व शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य ऍडव्होकेट धर्यशील पाटील होते गायकवाड पुढे म्हणाले मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात याचा लाभ घ्यावा यावेळी अॅडवोकेट धैर्यशील पाटील म्हणाले वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे काम केले आहे यावेळी , मुख्याध्यापक संजय पाटील, यांचे भाषण झाले तर यावेळी समाज कल्याण विभागाचे विक्रांत शिंदे , अंकुश चव्हाण, समीर पटेल आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विभाग प्रमुख प्रा. शशिकांत पाटील , प्रा.बाळासो शिरोटे, प्रा.एम आर बडवे ,एस आर महिंद आदि मान्यवर उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापक एस .टी पाटील यांनी केले प्रास्ताविक प्रा. संजय नागरगोजे यांनी केले आभार प्रा.डी ए .जाधव यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!