सुमारे शेकडो वर्षानंतर वनवासात असलेल्या श्रीराम लल्लाचे लक्ष्मण व जानकी सह मंदिरात पदार्पण होणार :ह.भ.प.तुषार महाराज दळवी
सुमारे शेकडो वर्षानंतर वनवासात असलेल्या श्रीराम लल्लाचे लक्ष्मण व जानकी सह मंदिरात पदार्पण होणार : ह.भ.प.तुषार महाराज दळवी.
आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ३० डिसेंबर.
सुमारे शेकडो वर्षानंतर वनवासात असलेल्या श्रीराम लल्लाचे लक्ष्मण व जानकी सह मंदिरात, अयोध्या येथे मोठ्या समारंभात पदार्पण होणार असून आपण या घटनेचे साक्षीदार होणार असल्याने, हा आनंदोत्सव आपल्या गावोगावी मंदिरात साजरा करूया, असे मावळभूषण, भागवताचार्य ह.भ.प.तुषार महाराज दळवी यांनी कीर्तनात सांगितले.
औढोलीत श्रीराम मंदिरासाठी आणलेल्या कलशाचे पूजन करण्यात येवून कीर्तनाचे आयोजन औंढोली ग्रामस्थांतर्फे करण्यात आले होते.यावेळी महाराजांनी श्रीरामाचा आदर्श घेवून जीवन जगल्यास संसार सुखाचा करता येतो.सध्या या युगामधे नामाचा महीमाच आपणास तारणार आहे, त्यामुळे नाम घ्या.काम करताना, चालताना, बोलताना नाम घ्या ! असे ते म्हणाले.मृदूंगमणी मृदूंगाचार्य संतोषबुवा घनवट यांनी कीर्तनसाथ केली.