ताज्या घडामोडी

तर येरळा वाचविण्यासाठी आम्हाला मैदानात उतरावे लागेल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांचा इशारा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
वाळू उत्खनन प्रकरणात पत्रकाराला झालेली मारहाण आणि याबाबत अधिकाऱ्यांचे वर्तन गंभीर आहे. हे असेच होणार असेल तर श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वात मुक्ती संघर्ष चळवळीच्या ज्या निर्णायक लढ्यामध्ये येरळेच्या वाळू उत्खननास बंदी आली. तो संघर्ष आणि ते जनआंदोलन श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वात आम्ही उभे करू.

वाळू उत्खननास बंदी आणण्याचा निर्णय श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली संघर्ष चळवळीच्या माध्यमातून केलेल्या संघर्षातून झालेला आहे. यानुसार देशातील येरळा नदीचा हा एकमेव तुकडा आहे. जिथे वाळू उपश्यास बंदी आहे. नदीकाठावरील आठ किलोमीटर परिसरातील गावांना परमिट पद्धतीने वाळू नेण्यास परवानगी आहे यानुसार प्रत्येक वर्षी महसूल विभागाने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या नदी परिसरातील किती वाळूचे उत्खनन झाले याचे ऑडिट सादर करणे बंधन कारक आहे. तरीही अशा पद्धतीने वाळूचा उपसा सुरूच असेल तर ज्या संघर्षातून हा निर्णय झाला त्याच प्रकारचे जन आंदोलन उभा श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली संघर्ष उभा करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दल या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!