अध्यात्मिकमावळलोणावळा

विजयादशमी निमित्त लोणावळ्यात सोने लुटून व देवींच्या मिरवणुका काढुन रावणदहणाच्या कार्यक्रमाने साजरी.

Spread the love

विजयादशमी निमित्त लोणावळ्यात सोने लुटून व देवींच्या मिरवणुका काढुन रावणदहणाच्या कार्यक्रमाने साजरी.Vijayadashami was celebrated in Lonavala with looting of gold and processions of goddesses.

आवाज न्यूज : मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २७ ऑक्टोबर.

विजयादशमी लोणावळ्यात सोने लुटून व देवींच्या मिरवणुका व रावणदहणाचे कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
हिंदु समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांचेवतीने डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे मागे मैदानावर चाळीस फूट रावणाची प्रतिमा उभारून तिचेवर प्रभुश्रीराम व लक्ष्मण यांनी बाण मारल्यावर तिचे दहन करण्यात आले.या कार्यक्रमास आठशे ते हजार नागरिक मुलामुलींसह उपस्थित होते.

यावेळी हिंदुत्वाबाबत वक्ते आयुतोष झा यांनी विचार व्यक्त केले.त्यांनी सनातन हिंदुधर्माची व्याख्या व व्याप्ती सांगून स्वातंञ्य मिळाल्या पासून हिंदु धर्मावर होणारे हल्ले याबाबत माहिती आपल्या भाषणात सांगितले.तसेच यासाठी सर्व हिंदु बांधवांनी संघटीत व्हा.एकञ या, तरच आपला धर्म वाचेल. ता.२५ रोजी विजयादशमी निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात वक्तेआशुतोष झा म्हणाले , ” आपला धर्म आपली माती याचे रक्षणासाठी एकञ या ! ! धर्माचे रक्षणासाठी प्रभु श्रीराम यांनी , भगवान श्रीकृष्ण यांनी अवतार घेवून रावणाचा वध केला.कंसाला मारले.आपल्या धर्मावर होणारे आतिक्रमण रोखण्यासाठी ,  प्रखर देशभक्त व्हा.भगवतगीता, रामायण, महाभारत यांचे वाचन करा.वेळप्रसंगी मुली व महिलांनी महिषासुरमर्दिनी व्हावे, असे ते म्हणाले.

यावेळी सूञसंचालन आनंद गावडेसर यांनी केले.
प्रभु श्रीराम वेषात ऋषी शिंगाडे व लक्ष्मणाचे भूमिकेत आकाश निकम हे आकर्षक विद्युतरोषणाईच्या रथातून व्यासपीठावर आले.व त्यांनी बाण मारून रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले. हजारो लोकांनी यावेळी भारत का बच्चा बच्चा कहता है ! जय श्रीराम जय श्रीराम !!
या गाण्यावर घोषणा देत ठेका धरला.

असंघटित कामगार संघटना, गावठाण लोणावळा तर्फे नवराञौत्सवाच्या निमित्ताने बसविलेल्या देवीची आकर्षक रथावर सजावट करून शारदा ढोलताशांचा दणदणाटात श्रीभैरवनाथ मंदिर ते छञपती शिवाजी महाराज चौक तसेच टाटा तलाव येथे भव्यदिव्य मिरवणूक काढली होती.
भांगरवाडी येथील श्री साईनाथ मंदिर नवराञौत्सव मंडळांच्यावतीने भैरव गर्जना ढोलताशा पथकाच्या दणदणाटात भव्य मिरवणूक काढली होती. इंद्रायणी नदी येथे कृत्रिम तलावापर्यंंत मिरवणूकीची सांगता झाली. श्री असंघटीत कामगार संघटना  गावठाण यांचेतर्फे भव्य आकर्षक रथावरून मिरवणूक काढण्यात आली होती.


.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!