ताज्या घडामोडी

कासेगांव पोलीस ठाणे हददीतील सराईत दोघे तडीपार

Spread the love

कासेगांव पोलीस ठाणे हददीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार १) सुरेश जयवंत चव्हाण वय २५ वर्षे, रा. वाटेगांव ता. वाळवा व जागरनाथ बाजीराव पाटील वय ४२ वर्षे, रा. नेर्ले या दोघा सराईतांना अनुक्रमे ०१ वर्षे व ६ महिने या कालावधीकरीता सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.

सुरेश जयवंत चव्हाण याचे विरुध्दात कासेगांव पोलीस ठाणेत चोरी करणे, दरोडा घालणेकरीता एकत्र जमणे, दरोडा घालण्याची पुर्व तयारी करणे, घातक शस्त्र बाळगणे, यासारखे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत तसेच जागरनाथ बाजीराव पाटील याचे विरूध्द गर्दी मारामारी, घातक हत्यारांनी दुखापत पोहचवणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उददेशाने अपमान करणे फौजदारी पात्र धाकदपटशहा असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे  पोलीस अधीक्षक सांगली श्री दिक्षित गेडाम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कृष्णात  पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली कासेगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश मते, पोलीस हवालदार महेश रामकृष्ण गायकवाड यांनी सुरेश जयवंत चव्हाण व जागरनाथ बाजीराव पाटील यांचे विरूध्द हददपार प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधीक्षकांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर यांचे कार्यालयाकडे सादर केला. त्यानूसार उपविभागीय दंडाधिकारी बाळवा इस्लामपूर यांनी या दोघांवर तडीपारीचा आदेश पारीत केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!