आरोग्य व शिक्षण

शिवजयंती निमित्त ऐतिहासिक नगरी कार्ला येथे शिवज्योतींचे स्वागत व शिवभक्तांना अल्पोपाहाराचे वाटप

Spread the love

कार्ला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लोहगड,विसापूर किल्यावर राज्यभरातुन ठिकठिकाणाहून शिवज्योत घेऊन येणा-या शिवज्योतींचे व कार्ला पंचक्रोशीतील शिवज्योतींचे ऐतिहासिक नगरी कार्ला येथे शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले.

गेल्या नऊ वर्षांपासून शिवज्योत घेऊन येणा-या शिवभक्तांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात येते यावर्षीही अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले.सावित्रीबाई फुले विद्यापीठ युवासेना कक्षाचे उपाध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिलीप हुलावळे,संभाजी हुलावळे,भाऊसाहेब हुलावळे,रविंद्र केदारी,सुरेखा हुलावळे यांनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

तर शिवज्योतींचे स्वागत पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,कार्ला येथील तलाठी मिरा बोह्राडे,महावितरणचे उपअंभियंता अक्षय पवार,युवासेनेचे मयुर थोपटे,गणेश हनुमंत हुलावळे,विजय डोळस,सुनिल सावळे,ग्रामपंचायत सदस्या वत्सला हुलावळे,ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,सतिश मोरे,विनोद बाळु हुलावळे,मंगेश हुलावळे, जेष्ठ नागरिक सदाशिव हुलावळे,शिवराम हुलावळे,भरत आबु हुलावळे,रोहीदास शिर्के,कैलास कुंडलिक हुलावळे, संदीप बाळु हुलावळे,बाळु आबु हुलावळे, सचिन भिम हुलावळे,इत्यादींच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!