आरोग्य व शिक्षण

तळेगावातील पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू – अरुण माने यांचा इशारा

पाणीपुरवठा सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

Spread the love

तळेगाव : ऐन सणासुदीमध्ये तळेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 9 व 13 मधील ढोरवाडा, निळकंठ नगर, तुकाराम नगर, म्हस्करनेस कॉलनी, साईनाथ कॉलनी, संभाजीनगर या भागामध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा नगरसेवक अरुण माने यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकार्‍यांना दिला आहे.

ऐन दिवाळीत पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. दोन – दोन दिवस पाणीपुरवठा केला जात नाही आणि उशिरा येते. यामुळे नागरिक वैतागले आहेत. नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

याबाबत प्रशासनाशी संपर्क केला असता अनेक कारणे दिली जातात अशी माहिती माने यांनी दिली. प्रशासनाने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पालिकेवर मोर्चा काढू असा इशारा माने यांनी दिला. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करता येत नसेल तर सभापतींनी या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक अरुण माने यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!